Zee Marathis Actresses came together: मालिकेतील कलाकारांचा चाहतावर्ग मोठा असतो. एखाद्या गोष्टीतील व्यक्तीरेखा साकारताना हे कलाकार त्या पात्राशी समरुप होतात. त्यामुळे त्यांचे पात्र त्या कलाकारांची ओळख बनते. कलाकारांना त्या पात्राच्या नावाने चाहते ओळखतात.
आता झी मराठीवरील अनेक मालिका लोकप्रिय ठरल्या आहेत. यामध्ये ‘लक्ष्मी निवास’, ‘पारू’, ‘शिवा’, ‘लाखात एक आमचा दादा’, ‘देवमाणूस’, या मालिकांचा समावेश आहे. आता ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील भावना, पारू मालिकेतील पारू आणि शिवा मालिकेतील शिवा या एकत्र आल्या आहेत.
पारू, शिवा आणि भावना आल्या एकत्र
अभिनेत्री शरयू सोनावणेने पारू ही भूमिका साकारली आहे. शिवा या भूमिकेत पूर्वा कौशिक दिसत आहे. तर लक्ष्मी निवास मालिकेतील भावना ही भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने साकारली आहे. अक्षया देवधरने इन्स्टाग्राम स्टोरीवर पूर्वा आणि शरयूबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. शरयू व पूर्वाने हे फोटो रिपोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करताना लवकरच काहीतरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असे लिहिले आहे. तर पुढे एक मजेशीर व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

आता पारू, शिवा आणि भावना कशानिमित्त एकत्र आल्या आहेत, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्या कार्यक्रमात त्या एकत्र दिसणार आहेत, असाही प्रश्न पडत आहेत. त्यामुळे आता या लोकप्रिय कधी एकत्र दिसणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
पारू मालिकेत सध्या दिशा परत आल्याने पारू तसेच किर्लोस्करांच्या आयुष्यातील अडचणी वाढल्या आहेत. तर शिवा मालिकेत शिवाचा जवळचा मित्राचा रॉकीचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुहास व त्याची कट कारस्थान करत शिवाला त्रास देताना दिसत आहेत. तर लक्ष्मी निवास मालिकेत नुकतेच सिद्धू व भावनाचे लग्न झाले आहे. मात्र, सिद्धूचे कुटुंब भावनाला त्रास देत असल्याचे दिसत आहे. तर सिद्धू वेळोवेळी भावनाच्या बाजूने घरच्यांना विरोध करताना दिसत आहे.