‘पारू’ (Paaru) या मालिकेत सतत काही ना काही घडताना दिसते. आदित्य व पारू यांची मैत्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसते. पारू कोणत्या संकटात सापडू नये, यासाठी आदित्य प्रयत्न करताना दिसतो. ती संकटात सापडली, तर तो तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतो. आता मात्र अनुष्कामुळे त्यांच्या मैत्रीत दुरावा येताना दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अहिल्यादेवीला आता त्यांच्यातील जवळीकता, मैत्री आवडत नसल्याचे दिसत आहे. तिच्या मते- मैत्रीची सीमारेषा ओलांडू शकते. पारू किर्लोस्कर घराची मुलगी होऊ शकते, आदित्यची मैत्रीण होऊ शकते; मात्र ती त्या घराची सून होऊ शकत नाही. थोडक्यात- ती आदित्यची पत्नी होऊ शकत नाही. या सगळ्यात पारूने आदित्यला तिचा पती मानले आहे.

एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. शूटिंगदरम्यानचे आदित्यबरोबरचे लग्न तिने खरे मानले. तेव्हापासून ती आदित्यला नवरा मानते आणि ती त्याच्या प्रेमात आहे. आदित्य मात्र तिला त्याची चांगली मैत्रीण मानतो. आता पारूने आदित्यच्या नावाने एक उखाणा घेतल्याचे झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आदित्यसर हे तुमच्यासाठी….

झी मराठी वाहिनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला पारू म्हणते, “आदित्यसर हे तुमच्यासाठी, हळदी कुंकू करतेय मी सगळ्यांपासून लपून-छपून, आदित्यसरांचं नाव घेते माझ्या देवीआईंचा मान राखून”, पारू हे नाव घेत असताना लाजत असल्याचे दिसत आहे. ती नाव घेत असताना ‘लाखात एक आमचा दादा’मधील तुळजा, ‘सावळ्याची जणू सावली’मधील सावली व ‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीला या तिघी तिथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. पारूने नाव घेतल्यानंतर या तिघीनींही टाळ्या वाजवत तिचे कौतुक केल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लाजत-मुरडत पारूने घेतलाय उखाणा..! अशी कॅप्शन दिली गेली आहे. झी मराठी वाहिनीवरील हे सर्व कलाकार मकर संक्रांतीनिमित्त एकत्र येणार असल्याचे समोर आलेल्या विविध व्हिडीओंमध्ये पाहायला मिळत आहे. १२ जानेवारीला मकर संक्रांत विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.

हेही वाचा : जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पारू या मालिकेत दाखविल्याप्रमाणे सध्या अनुष्कामुळे पारू, अहिल्यादेवी व आदित्य यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाल्याचे दिसत आहे. पारू आता शहर सोडून गावी चालली आहे. हे सर्व अनुष्काने घडवून आणले आहे. आता आदित्य तिला गावी जाण्यापासून थांबवू शकणार का, अहिल्यादेवीचा जो गैरसमज निर्माण झाला आहे, तो आदित्य दूर करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.