बस किंवा लोकलमधून प्रवास करताना अनेक जणांना मोबाइल फोनवर मोठमोठ्याने बोलण्याची, गाणी ऐकण्याची, व्हिडीओ बघण्याची सवय असते. पण यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच गेल्यावर्षी बेस्टने हेडफोन शिवाय बसमध्ये मोबाइल वापरण्यास मनाई केली. अशाच प्रकारे आता पीएमपी बसमधून प्रवास करताना हेडफोनची सक्ती करण्यात आली आहे.

पीएमपी प्रशासनाने प्रवास करताना मोबाइलचा वापर करायचा असेल तर हेडफोनचा वापर बंधनकारक केला आहे. नाहीतर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याच संदर्भात एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

हेही वाचा – सई लोकूरच्या चिमुकल्या लेकीला सलील कुलकर्णी यांचं आवडतं ‘हे’ गाणं, स्वतः खुलासा करत म्हणाली…

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील अभिनेता कुणाल धुमाळने ही पोस्ट केली आहे. पीएमपीचं वृत्त इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्याने लिहिलं आहे, “सगळीकडेच सक्ती झाली पाहिजे. विशेष म्हणजे मुंबई लोकलमध्ये.”

हेही वाचा – “दुसऱ्या बाळाचा प्लॅन आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर सई लोकूर उत्तर देत म्हणाली, “खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कुणाल धुमाळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेपूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. या मालिकेत कुणालने देवाची भूमिका साकारली होती. अभिमन्यूच्या मृत्यूनंतर देवाची म्हणजेच कुणालची या मालिकेत दमदार एन्ट्री झाली होती. कुणालची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. आता तो ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत जांबुवंत जांभळे भूमिकेत झळकला.