Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर लग्नबंधनात अडकली आहे. सुरुचीने अभिनेता पियुष रानडे याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सुरुची अडारकरने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. यात तिने तिच्या लग्नाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत सुरुची ही नववधूच्या रुपात पाहायला मिळत आहे. तर अभिनेता पियुष रानडे हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र परिधान करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “We are engaged…”, पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, पहिला फोटो समोर

सुरुचीने हा फोटो पोस्ट करताना “आनंदाचा दिवस” असे कॅप्शन दिले आहे. त्याबरोबरच तिने PSILoveYou असा हॅशटॅगही शेअर केला आहे. त्या दोघांच्या या फोटोवर अनेक कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

सुरुची अडारकरने २००६ मध्ये सिनसृष्टीत पदार्पण केले. पेहचान या मालिकेत ती झळकली. त्यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये काम केले. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर सुरुची ही ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकली. सध्या ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “सेटवर या सहा जणी…”, सुरुची अडारकरने सांगितला ‘बाईपण भारी देवा’मध्ये काम करण्याचा अनुभव, म्हणाली, ” केदार सर खरंच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसरीकडे पियुष रानडे हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. पियुष हा सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत विश्वजीतच्या भूमिकेत दिसत आहे. याआधी तो ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकला. पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. याआधी तो अभिनेत्री शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्नबंधनात अडकला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.