scorecardresearch

Premium

सप्तपदी ते मंगळसूत्र; सुरुची अडारकर आणि पियुष रानडेच्या लग्नाचा व्हिडीओ आला समोर

ते दोघेही फार आनंदात असल्याचे दिसत आहे.

Suruchi Adarkar Piyush Ranade wedding
सुरुची अडारकर-पियुष रानडेच्या लग्नाचा व्हिडीओ समोर

मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर नुकतीच विवाहबंधनात अडकली. सुरुचीने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तिच्या लग्नाचे, हळदीचे आणि मेहंदीचे फोटो तिने पोस्ट केले होते. आता तिने तिच्या लग्नाची झलक दाखवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली सुरुचीने बुधवारी ६ डिसेंबरला गुपचूप लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दलची माहिती सर्वांना दिली. आता तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने सर्वांचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : मराठमोळा अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर घेतल्या सप्तपदी

singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
Loksatta entertainment A psychoanalytic Ghalib play
नाटय़रंग: मनोविश्लेषणात्मक सुंदर खेळ; ‘गालिब’

सुरुचीने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती नववधूच्या रुपात पाहायला मिळत आहे. तर पियुषही यावेळी वराच्या रुपात दिसत आहे. यात सुरुची ही पियुषच्या हातात कंकण बांधत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर ते दोघेही सप्तपदी घेताना दिसत आहेत.

यानंतर पियुष हा सुरुचीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाही यात पाहायला मिळत आहे. यावेळी ते दोघेही फार आनंदात असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा : पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर सुरुची अडारकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

दरम्यान सुरुची अडारकरचे हे पहिलं लग्न आहे. तर पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. याआधी तो अभिनेत्री शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्नबंधनात अडकला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Piyush ranade and suruchi adarkar wedding video share on instagram nrp

First published on: 09-12-2023 at 21:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×