छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘कोण होणार करोडपती?’ कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमात दर आठवड्याच्या विशेष भागात खेळायला आणि गप्पा मारायला कलाकार मंडळी येत असतात. या आठवड्याच्या विशेष भागात म्हणजे आज सुप्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या, निवेदक व गायिका पल्लवी जोशी सहभागी होणार आहेत. याचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये पल्लवी जोशी आपल्या तारुण्याबद्दल बोलताना दिसत आहेत.

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रांत आपल्या अभिनयाने पल्लवी जोशी यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच मराठी, हिंदी, गुजराती या तिन्ही भाषांमध्य़े त्यांनी काम केले आहे. त्यांना संवेदनशील अभिनेत्री असे म्हटले जाते. दोन-चार वर्षांत त्यांच्या अभिनय कारर्किदीला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्री, निर्मात्या, निवेदक व गायिका पल्लवी जोशी या आज ‘कोण होणार करोडपती?’मध्ये खेळताना, तसेच काही किस्से सांगताना दिसणार आहेत.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मंदार जाधवने दुसऱ्याच्या लग्नात उरकला होता स्वतःचा साखरपुडा; खुलासा करत म्हणाला…

या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे; ज्यामध्ये त्यांना कार्यक्रमाचे होस्ट अभिनेते सचिन खेडेकर विचारतात, “तुझं वय काय? कशी अशी दिसतेस? आणि तुझ्या तरुणपणाचं काय रहस्य आहे?” या प्रश्नाला उत्तर देताना पल्लवी जोशी सांगतात, “रहस्य असं वाटतं की, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. माझ्या जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी मला खूप जपलं आणि मला हसतमुख ठेवलं. त्यामुळे कदाचित हे माझ्या तरुणपणाचं रहस्य असावं.”

हेही वाचा – शरद पोंक्षे यांनी सोनाली कुलकर्णीची मागितली होती माफी, खुलासा करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”

दरम्यान, पल्लवी जोशी यांच्यापूर्वी ‘कोण होणार करोडपती?’ या कार्यक्रमाच्या विशेष भागांत गजलनवाज भीमराव पांचाळ, गायिका प्रियांका बर्वे, अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित असे बरेच कलाकार सहभागी झाले होते.