Actress reveals about her past: पडद्यावर दिसणारे कलाकार हे विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र, अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यात काहीतरी खळबळजनक घडत असते.

आता हे कलाकार अनेकदा स्वत:च त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा करतात. तर कधी त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून त्यांच्या अनेक गोष्टी चाहत्यांना माहित होतात.

सपने सुहाने लडकपन के या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपल त्यागी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा पार पडला. मात्र, याचदरम्यान तिच्या कठीण काळाबद्दल अभिनेत्रीने खुलेपणाने सांगितले आहे.

अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने दिलेला धोका

अभिनेत्रीने काही शोमध्ये चांगले काम केले आहे. मात्र, गेल्या काही काळापासून ती कोणत्याही मालिकांमध्ये दिसली नाही. अभिनेत्रीने १६ व्या वर्षापासून कोरिओग्राफर असिस्टंट म्हणून काम करायला सुरूवात केली. अभिनेत्रीने असाही खुलासा केला की एक काळ असा होता की तिचे ११ शो फ्लॉप ठरले. त्यानंतर तिला सपने सुहाने लड़कपन के या शोमध्ये गुंजन ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या शोमधून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. याचदरम्यान, अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात मोठी खळबळ निर्माण झाली होती.

रुपल त्यागीच्या बॉयफ्रेंडने तिला धोका दिला. त्यानंतर तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला डेट करू लागला. रुपलला माहित झाले की तिचा बॉयफ्रेंड एकाचवेळी दोन मुलींना डेट करत होता. त्यामुळे मानसिक त्रासाचा सहन करावा लागला. यादरम्यान तिने अनेक मोठ्या शोचे ऑफर नाकारले. या सगळ्यात ती अशा मित्रांच्या संगतीत आली, ज्यामुळे ती चुकीची कामे करू लागली. मात्र, तिला लवकरच तिच्या चुकांची जाणीव झाली. तिने ती संगत सोडून दिली. त्यानंतर रुपलने ध्यान करायला सुरुवात केले. त्यानंतर ती मानसिकदृष्ट्या सदृढ झाली.

आता रुपला तिच्या आयुष्यात एका नवीन अध्यायाची सुरुवात करत आहे. रुपलचे ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे, त्याचे नाव नोमिश भारद्वाज असे आहे. ५ डिसेंबर २०२५ ला अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे.