सध्या चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कलाकारांच्या आत्महत्येच्या बऱ्याच बातम्या कानावर पडत आहेत. नुकतंच टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्री हादरली. तिच्या आत्महत्येनंतर नुकतंच एका लोकप्रिय अभिनेत्रीने मनोरंजनसृष्टीतील आत्महत्यांबद्दल भाष्य केलं आहे.
‘अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो’ आणि अशा काही लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रतन राजपूत हिने नुकतंच यावर भाष्य केलं आहे. रतन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकतंच तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून या क्षेत्रातील बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत खुलासा केला आहे. शिवाय या क्षेत्रात आत्महत्येचं प्रमाण का वाढलं आहे यावरही तिने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “मला जाडी म्हणून…” चित्रपटसृष्टीतील बॉडी शेमिंगबाबत शिल्पा शिरोडकरचं मोठं विधान
रतन म्हणाली, “ही फार गंभीर गोष्ट आहे आणि यावर भाष्य केलंच पाहिजे. या क्षेत्रात दीखाव्याला फार महत्त्व आहे. भले तुमच्या खिशात पैसे नसोत मीडियासमोर येण्यासाठी तुम्हाला मोठमोठ्या पार्ट्या द्याव्या लागतात. तुमच्याकडे घराचं भाडं भरायला पैसे नसोत पण बाहेर लोकांना दाखवायला तुम्हाला महागड्या गोष्टींची गरज असते. ह्याच समस्या नंतर मोठ्या होतात आणि मग आत्महत्येचं प्रमाण वाढतं.
पुढे ती म्हणाली, “मी पण पटणाची आहे, मीही बरीच वर्षं मुंबईत आहेत पण मी कधीच असा दिखावा केला नाही, या अशा बेगडी लोकांपासून मी कायम चार हात लांब राहिले. मी माझ्या गावातही अत्यंत साधं राहणीमान पसंत करते.” रतन सोशल मीडियावर तिचे व्लॉग्स शेअर करत असते. या व्हिडिओज मधून ती तिच्या गावच्या जीवनशैलीचे चित्रण करत असते.