‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे प्राजक्ता माळीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यावर अभिनेत्रीने अनेक चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केलं. अभिनय क्षेत्रातील करिअर सांभाळात वैयक्तिक आयुष्यात प्राजक्ताने तिचा स्वत:चा व्यवसाय देखील सुरू केला. सध्या अभिनेत्री एका कार्यक्रमानिमित्त श्री श्री रविशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात पोहोचली आहे. प्राजक्ता कलाक्षेत्राशी निगडीत असल्याने तिला प्रवचनासाठी खास निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्रीने श्री श्री रविशंकर यांना कलाकारांशी संबंधित काही प्रश्न विचारले. याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

प्राजक्ता माळी श्री श्री रविशंकर यांना विचारते, “गुरुदेव असं म्हटलं जातं की, कलाकार सगळ्यांच्या जीवनात आनंदात आणतात पण, वैयक्तिक आयुष्यात ते फार दु:खी असतात असं म्हटलं जातं. आता या गोष्टी ऐकल्यावर खऱ्या देखील वाटतात. कारण आमच्या आयुष्यात खरंच खूप चढउतार असतात. असुरक्षितपणाची भावना प्रत्येकात असते पण, कलाकारांमध्ये सर्वाधिक असते. करिअर, आर्थिक व मानसिकदृष्ट्या तसेच काही कलाकारांच्या नातेसंबंधात देखील अस्थिरता असते. प्रत्येक कलाकार नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल याचा विचार करत असतो. त्यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी कलाकारांनी काय करावं? याशिवाय वैयक्तिक आयुष्यात कुटुंब व मित्रमंडळीबरोबर कसं वागावं? याबद्दल कृपया मार्गदर्शन करा.”

हेही वाचा : Video : चाळीतील एकोपा, सत्यनारायण पूजा, अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने दाखवली चाळ संस्कृतीची झलक

प्राजक्ता माळीच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री श्री रविशंकर म्हणाले, “अगदी बरोबर! कलाकार नेहमीच खोट हास्य व खोटा आनंद घेऊन सर्वत्र वावरत असतात. दुसऱ्यांना आनंदी ठेवत असताना कलाकार स्वत:ला विसरून जातात. त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. प्रत्येक कलाकार स्वभावाने अतिशय भावुक असतात आणि भावना कधीच एकसारखी नसते. कलाकाराने आपल्या वैयक्तिक भावभावनांचा देखील विचार केला पाहिजे. यामुळे आयुष्यात त्यांना कधीही एकाकीपणा जाणवणार नाही.”

हेही वाचा : “प्रजासत्ताक दिनी इंग्रजी गाणी, डीजेचा तडका अन्…”, मराठी दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट; म्हणाले, “डोळ्यांत पाणी…”

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कलाकारांनी नेहमी योग व अध्यात्मिक ध्यान करावे. अध्यात्मिक मार्ग धारण केल्याने प्रत्येक कलाकार सुखी होऊ शकतो.” असं श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं. दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कलाकारमंडळींसह तिचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेची जबाबदारी निभावत आहे.