Prajakta Gaikwad Engagement Photo : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने इन्स्टाग्रामवर मेहंदी सोहळ्याचा व्हिडीओ शेअर करत ती ७ ऑगस्टला साखरपुडा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमका कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.
प्राजक्ताने लग्न ठरल्याची हिंट जून महिन्यात तिच्या चाहत्यांना दिली होती. ‘पाहुणे मंडळी’, ‘कुंकवाच्या कार्यक्रमाचे फोटो’ असे कॅप्शन देत प्राजक्ताने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले होते. यावरून अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार असा अंदाज तिच्या चाहत्यांनी बांधला होता.
अखेर आज ( ७ ऑगस्ट २०२५ ) प्राजक्ताचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीचा होणारा नवरा कोण आहे, त्याचं नाव काय आहे हे सुद्धा सर्वांसमोर उघड झालेलं आहे.
प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे शंभुराज. अभिनेत्री साखरपुड्यासाठी ऑफ व्हाइट रंगाची डिझायनर साडी नेसून तयार झाली होती. यावर तिने लाल रंगाचा शेला घेतला होता. प्राजक्ताने साखरपुड्यासाठी एकदम रॉयल लूक केला होता. यावेळी अभिनेत्रीच्या ब्लाऊजवर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं शंभुराज हे नाव कोरल्याचं दिसलं. याशिवाय प्राजक्ताने तिच्या मेहंदीमध्ये सुद्धा ‘S व P’ ही अक्षरं लिहिली आहेत.
प्राजक्ता व शंभुराज या दोघांनी एकत्र फोटोशूट देखील केलं. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संपूर्ण मनोरंजन सृष्टीतून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. खऱ्या आयुष्यात तिच्या पतीचं नाव देखील शंभुराज असल्याने तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत.


दरम्यान, प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे सर्वत्र लोकप्रिय झाली. तिने यामध्ये महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. आतापर्यंत तिने ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई माझी काळुबाई’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.