Prajakta Gaikwad Went Pandharpur Temple : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता गायकवाड. आजवर तिने अनेक मालिका व सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. वैयक्तिक आयुष्यात प्राजक्ताने नुकताच साखरपुडा केला. गेल्या काही दिवसांपासून “कंकुवाचा कार्यक्रम”, “पाहुणे मंडळी” अशा पोस्ट शेअर करत अभिनेत्री तिच्या लग्नाची हिंट चाहत्यांना देत होती.
अखेर ७ ऑगस्टला प्राजक्ताचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. तिचा होणारा पती नेमका कोण आहे हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. साखरपुड्याच्या दिवशी प्राजक्ताने तिचे पती शंभुराज खुटवड यांच्यासह पहिला फोटो शेअर केला. ते व्यवसायाने उद्योजक आहेत. या दोघांची पहिली भेट प्राजक्ताच्या गाडीला एका ट्रकवाल्याने धडक दिल्यामुळे झाली होती. हा ट्रक शंभुराज यांच्या मालकीचा होता. या अपघतात अभिनेत्रीच्या गाडीचं नुकसान झाल्याने प्राजक्ताला शंभुराज स्वत: सेटवर सोडायला गेले होते.
पहिल्या भेटीनंतर प्राजक्ता आणि शंभुराज यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी शंभुराज यांनी प्राजक्ताला लग्नाची मागणी घातली, अभिनेत्रीच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. दोन्ही कुटुंबाची बोलणी झाल्यावर प्राजक्ता-शंभुराज यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला.
पंढरपूरला जाण्याचं हे आहे खास कारण…
आता साखरपुडा पार पडल्यावर प्राजक्ता आणि शंभुराज पंढरपूरला विठुमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. यामागे एक खास कारण आहे ते म्हणजे आज श्रावणातील एकादशी आहे. मंदिरात विठुरायाचा आशीर्वाद घेतानाचा सुंदर फोटो शंभुराज यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. शंभुराज यांनी फोटो शेअर करत याला “एकादशी विठ्ठल माऊली” असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी व प्राजक्ताच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “विठ्ठल रुक्मिणी”, “तुमची जोडी खूपच सुंदर आहे”, “आयुष्याची नयनरम्य वाटचाल करत असताना कसल्याही प्रकारचे दुःख आपल्या वाट्याला येऊ नये हिच विठुरायाच्या चरणी प्रार्थना”, “S लव्ह P किती सुंदर जोडी” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या फोटोवर केल्या आहेत.