मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी मुळे ती घराघरात पोहचली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील तर बरेच व्हिडिओ समोर येतात. पण प्राजक्ताला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात सर्वात जास्त कोण आवडतं? हे तुम्हाला माहिती आहे का? खुद्द प्राजक्तानेच याबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- ‘बिग बॉस’नंतर ‘खतरों के खिलाडी’चा पहिला फायनलिस्ट बनला शिव ठाकरे? समोर आली मोठी माहिती
एका मुलाखतीत प्राजक्ताला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिचं सर्वात आवडतं कोण आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्राजक्ता म्हणाली, “सगळेच खूप भारी आहेत. असा एकच कोणी फेव्हरेट किंवा कमालीचा आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण सगळ्यांची वैशिष्ट्य आणि परफॉर्मन्स स्टाइल वेगळी आहे, प्रत्येकाचा ह्युमर वेगळा आहे. मुळात सगळे माझे जिगरी दोस्त आहेत.”
पुढे प्राजक्ता म्हणाली, असं असलं तरी समीर चौघुले ही माझा सर्वात आवडती व्यक्ती आहे. “मी त्याच्याविषयीचं प्रेम लपवू शकत नाही. कलाकार म्हणून तो तर तो कमाल आहे, पण माणूस म्हणून तो खूप कमाल आहे. तो मराठीतील चार्ली चॅप्लिन वाटतो. त्याच्या रिअॅक्शन, त्याचे विनोद प्राजक्ता म्हणून मला जास्त आवडतं. सीनिअर फळीत तो आहे, तर ज्युनिअर सगळेच कमाल आहेत. मी त्यांच्यातला कोणीतरी एक निवडू शकत नाही.”
दरम्यान प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. तिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.