Pranit More first post after Bigg Boss 19 Exit: सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस सीझन १९ मधून मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा प्रवास रविवारी संपला. प्रणितच्या एक्झिटने चाहते आणि घरातील सदस्य दोघांनाही धक्का बसला. प्रणितला डेंग्यूचं निदान झालं आणि घरात त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला घराबाहेर जावं लागलं. घराबाहेर पडल्यावर प्रणितच्या अकाउंटवरून पहिली पोस्ट करण्यात आली आहे.
स्क्रीनच्या वृत्तानुसार, प्रणितला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तो डेंग्यूवर उपचार घेत आहे. शोमधील एका सूत्राने सांगितलं की प्रणितला घराबाहेर काढण्याचा निर्णय तात्पुरता असू शकतो आणि तो बरा झाल्यानंतर त्याला सिक्रेट रूममध्ये पाठवता येईल, पण हा सगळा निर्णय त्याच्या आरोग्यावर अवलंबून असेल. सध्या तरी, प्रणित शोमध्ये नसेल. या आठवड्यात घराचा कॅप्टन झाल्यानंतर लगेचच प्रणितला बाहेर पडावं लागलं.
प्रणित मोरे घराबाहेर पडल्यावर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे.
“तुम्हा सर्वांना अपडेट द्यायची होती, प्रणितची प्रकृती ठीक आहे. आम्ही बिग बॉस टीमच्या सतत संपर्कात आहोत आणि ते आम्हाला त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देत आहेत.
तुम्ही त्याला दिलेलं प्रेम, पाठिंबा आणि प्रार्थनांसाठी खूप खूप धन्यवाद. तो लवकर बरा व्हावा, यासाठी कृपया प्रार्थना करत राहा.
जय हिंद, जय महाराष्ट्र,” अशी पोस्ट प्रणित मोरेच्या इन्स्टाग्रामवर करण्यात आली आहे.
पाहा पोस्ट

एकीकडे प्रणितवर उपचार सुरू आहेत, पण तो घरच्यांना भेटू शकलेला नाही. कारण बिग बॉसची टीम त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देतेय, असं प्रणितच्या टीमने म्हटलं आहे. तर, दुसरीकडे प्रणितला वैद्यकीय कारणांनी घराबाहेर जावं लागेल, अशी घोषणा सलमान खानने केली. नंतर तो परतणार का? असं घरातील सदस्यांनी विचारल्यावर सलमानने नकारार्थी मान हलवली. त्यामुळे आता प्रणितबद्दल नेमका काय निर्णय होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
या आठवड्यात अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि मृदुल तिवारी वगळता प्रणित मोरे, गौरव खन्ना, कुनिका सदानंद, फरहाना भट्ट, तान्या मित्तल, प्रणित मोरे, नीलम, मालती चहर हे सर्वजण नॉमिनेट झाले होते. अभिषेक आणि अशनूर यांनी माईक न घालता गप्पा मारल्या होत्या. मनाई करूनही दोघांनी नियमाचे उल्लंघन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. कॅप्टन मृदुलने अभिषेक व अशनूर यांना नॉमनेशनपासून वाचवलं, त्यामुळे घरातील इतर सर्व सदस्य नॉमिनेट झाले.
