‘बिग बॉस मराठी’ फेम अमृता देशमुख व प्रसाद जवादे हे मराठी जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांनी नुकतीच त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि लग्नाची तारीखही सांगितली. अमृता व प्रसाद दोघेही त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता अमृताने प्रसादसोबतचा तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती व प्रसाद पहिल्या डेटवर कुठे गेले होते, याबाबतचा खुलासा केला आहे.

“करण सरांच्या ऑफिसमधून फोन…”, पत्नीसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट; म्हणाला, “त्या सगळ्या झगमगाटात…”

अमृताने व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “प्रसाद आणि मी एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. पण आमच्यात एक गोष्ट समान आहे की आम्हा दोघांना अगदी लहान, साध्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. आमची पहिली डेट अरई हिल्सवर (वेताळ टेकडी) कॉफीसह झाली होती. आयुष्यात साध्या गोष्टी आश्चर्यकारक आणि पुरेशा आहेत हे भविष्यात आम्हाला आठवत राहावं म्हणून हा व्हिडीओ आम्ही बनवला आहे. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये अमृता व प्रसादचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर दोघांचे मित्रमैत्रिणी व चाहते कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, अमृता व प्रसाद १८ नोव्हेंबर २०२३ रोजी पुण्यात कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहे. दोघांनी एका छोट्याशा समारंभात घरीच एंगेजमेंट केली.