मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे यांचा विवाहसोहळा २१ डिसेंबर २०२३ रोजी चिपळूण येथे थाटामाटात पार पडला. दोघांच्या लग्नाला मनोरंजनसृष्टीतील कलाकार व जवळच्या मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता गायिकेने शेअर केलेला नवीन व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मुग्धाने लग्नानंतर तिचं सासरी कसं स्वागत करण्यात आलं याचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लघाटेंच्या घरी लाडक्या सुनेच्या गृहप्रवेशासाठी आकर्षक सजावट आणि फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. कोकणातील परंपरेनुसार मुग्धाचा लघाटेंच्या घरी गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी दोघांनी सुंदर उखाणे देखील घेतले.

हेही वाचा : Video : उखाणा, मेहंदी, हळद अन् सप्तपदी! सुरुची अडारकर – पियुष रानडे यांच्या लग्नातील हा खास व्हिडीओ पाहिलात का?

गृहप्रवेशावेळी उखाणा घेताना प्रथमेश म्हणाला, “कपात ओतला चहा, चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय बाकी सगळ्या मारक्या म्हशी” गायकाचा उखाणा ऐकून एकच हशा पिकला. यानंतर मुग्धा उखाणा घेत म्हणाली, “मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर अन् माहेरची खूण प्रथमेशचं नाव घेऊन कलाश्रीमध्ये प्रवेश करते नीना आणि उमेश लघाटे यांची सून!” या व्हिडीओला ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” हे गाणं लावण्यात आलं आहे.

हेही वाचा : “…तर तुला पगारावर घेऊ शकतो”, भाजपाच्या जाहिरातीवरून टीका करणाऱ्याला मराठी अभिनेत्याचे उत्तर; म्हणाला, “मोदीजींमुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर शुभेच्छांचा भरभरून वर्षाव केला आहे. याशिवाय परंपरा, संस्कृती जपत दोघांनी लग्नाचे सगळे विधी केल्याने सध्या मुग्धा-प्रथमेशचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.