काही वर्षांपूर्वी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रेमाची कबुली देत ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर केलं. तर आज मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त प्रथमेशने हटके पण खास शुभेच्छा दिल्या आहेत.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मुळे मुग्धा आणि प्रथमेशचे कुटुंबीयही एकमेकांना अनेक वर्षांपासून खूप चांगले ओळखतात. मुग्धाची मोठी बहीण मृदुलाही तेव्हा आई-वडिलांबरोबर मुग्धाचं गाणं ऐकायला आवर्जून उपस्थित असायची. त्यामुळे प्रथमेश आणि मृदुलाची खूप चांगली मैत्री आहे. याचबरोबर अनेकदा मुग्धा, प्रथमेश आणि मृदुला एकत्र फिरताना दिसतात.
आणखी वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क
आज मृदूलाचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त प्रथमेशने तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मृदुलाबरोबरचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘दुनियादारी’ चित्रपटातील अत्यंत गाजलेला डायलॉग लिहिला. त्याने लिहिलं, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे!” आता प्रथमेशची ही स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा : “लग्न कधी करणार?” अखेर मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने केला खुलासा, म्हणाले…
दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा करताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अजूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. ते दोघं आता कधी लग्न करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.