‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेले ४ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता ही मालिका शेवटच्या टप्प्यात आली असून या मालिकेच्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका ‘रंग माझा वेगळा’ची जागा घेणार आहे. ४ सप्टेंबरपासून ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सुरू होणार आहे. यानिमित्तानं स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्रामवर पेजवर तेजश्रीचा एक नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तिनं ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कोणतं पात्र आवडतं? याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भाऊ हॉस्पिटलमध्ये दाखल; फोटो शेअर करत म्हणाली…

स्टार प्रवाहने शेअर केलेल्या व्हिडीओत, तेजश्री विविध प्रश्नांची उत्तर देताना पाहायला मिळत आहे. तिला पहिला प्रश्न विचारला जातो की, ‘आवडता सह अभिनेता किंवा अभिनेत्री?’ यावर तेजश्री म्हणाली की, “शुभांगी गोखले.” त्यानंतर तिला दुसरा प्रश्न विचारला जातो की, ‘सेटवरील आवडता टाइमपास?’ या प्रश्नाचं उत्तर देताना तेजश्री म्हणाली की, “मी कधीकधी विनोद करत असते. तर हाच माझा टाइमपास असतो.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला ‘हा’ क्षण आठवला की डोळ्यात येतं पाणी; म्हणाली, “करिअर संपलं…”

मग तेजश्रीला तिचा आवडता पदार्थ विचारला जातो. यावर ती म्हणाली की, ‘लेखिका अश्विनी शेंडेने माझ्यासाठी सेटवर कोलंबीची खिचडी करून आणली होती. ती मला खूप आवडते.’ यानंतर तिला प्रवाह परिवारातील आवडतं पात्र कोणतं? असं विचारलं जात. यावर तेजश्री म्हणाली की, “‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती हे पात्र आवडतं.” शिवाय तिला ‘प्रेमाची गोष्ट’मधील स्वतःचं मुक्ता हे पात्र आवडतं, असं पुढे सांगितलं.

हेही वाचा – दहीहंडी सरावात सहभागी होऊन मराठमोळ्या अभिनेत्यानं लुटला आनंद; व्हिडीओ शेअर करत गोपाळ मित्रांना केली विनंती, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तेजश्री व्यतिरिक्त राज हंचनाळे, शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर असे बरेच कलाकार पाहायला मिळणार आहेत.