‘होणार सून मी ह्या घरीच’, ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या नव्या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. ४ सप्टेंबरपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ ही तेजश्रीची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेमध्ये तेजश्री ‘मुक्ता’ या भूमिकेत पाहायला मिळत आहे. अशातच नुकताच तेजश्रीनं पहिल्या क्रशचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ‘हा’ आहे चिडका बिब्बा; समीर चौघुले म्हणाले…

तेजश्रीच्या नव्या मालिकेत तिच्याबरोबर राज हंचनाळे, शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव असे बरेच तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात? दोघांमधील प्रेम कसं बहरत? हे दाखवण्यात आलं आहे.

हेही वाचा – भक्ती बर्वे: ‘सळसळत्या ऊर्जेची फुलराणी’

नुकतीच तेजश्री ‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलवरील ‘माय फस्ट’ या सेगमेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिनं पहिल्या वहिल्या गोष्टींबद्दलचा खुलासा केला. तिला सुरुवात विचारलं गेलं की, ‘पहिलं स्वतःला घेतलेलं गिफ्ट कोणतं?’ यावर तेजश्री म्हणाली की, “जेव्हा मला पहिल्यांदाच कामाचे पैसे मिळाले होते, तेव्हा मी स्वतःला टी-शर्ट घेतला होता.” त्यानंतर ‘चित्रपटगृहात जाऊन पाहिलेला पहिला चित्रपट कोणता?’, असं विचारण्यात आलं. यावर तेजश्री म्हणाली की, “हम आपके है कौन” मग तिला तिच्या पहिल्या क्रशबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली की, “ब्रेट ली.” (ब्रेट ली हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे.)

हेही वाचा – “प्लीज मराठी चित्रपटात घ्या, मी उत्तम मराठी बोलते”; शाहरुख खानबरोबर ‘जवान’ चित्रपटात काम करणाऱ्या गिरीजा ओकचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजश्री एकाबाजूला मालिकेत झळकत असली तरी ती दुसऱ्या बाजूला यंदाच्या गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. गणपतीच्या आगामनापूर्वी मखर आणि डेकोरेशनचं काम करताना पाहायला मिळत आहे. याचे व्हिडीओ, फोटो तिनं इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहेत.