‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या मुक्ता-सागरच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यामुळे मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. अल्पावधीत घराघरात पोहोचलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. मुक्ता-सागरची जोडी ही आवडत्या जोडींपैकी एक झाली आहे. तसेच मालिकेतील इतर पात्र माधवी गोखले, इंद्रा कोळी, पुरुषोत्तम गोखले, जयंत कोळी, लकी, मिहीर, कोमल, मिहिका अशा सगळ्याचं पात्रांनी चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता-सागर सईच्या प्रेमाखातर लग्न करायला तयार झाले आहेत. त्यामुळे सध्या गोखले-कोळी कुटुंबात लग्नीनघाई सुरू आहे. नुकताच मुक्ता-सागरचा साखरपुडा, मेहंदीचा सोहळा पार पडला असून अजून संगीत, हळद, सप्तपदी बाकी आहेत. आजपासून मालिकेत मुक्ता-सागरचा संगीत सोहळा पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याला ‘स्टार प्रवाह’च्या परिवारातील कलाकार मंडळी खास हजेरी लावणार आहेत. तसेच डान्सही करणार आहेत. अशातच मालिकेतील एका अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली आहे.

हेही वाचा – Video: “यळकोट यळकोट जय मल्हार…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं खंडेरायाचं दर्शन, अनुभव सांगत म्हणाली…

मुक्ता-सागरच्या लग्नसोहळ्यानिमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकार मंडळी विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहेत. यादरम्यान मालिकेतील कलाकार मजेशीर किस्से, शूटिंगचे किस्से असं बरंच काही सांगताना पाहायला मिळत आहेत. अशातच ‘हंच मीडिया’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्याने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीर म्हणजे अभिनेता राजस सुळेने प्रेमाची कबुली दिली आहे. प्रेमाचे किस्से सांगता सांगता राज म्हणाला की, गेल्या आठ वर्षांपासून मी रिलेशनशिपमध्ये आहे. यावेळी त्याने प्रेयसीबरोबर फोटो देखील दाखवला. त्यामुळे उपस्थित असलेले इतर कलाकार त्याला म्हणाले की, तू खूप जणीचं हृदय तोडलं आहेस.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर स्वयंपाकापासून राहते लांब, कारण सांगत म्हणाली, “ओट्याजवळ उभं राहिलं तरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राजस आणि त्याच्या प्रेयसीचे सोशल मीडियावर बरेच फोटो आहेत. तसेच त्याने व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. चैत्राली पितळे असं राजसच्या प्रेयसीचं नाव आहे.