‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेता राज हंचनाळे घराघरांत लोकप्रिय झाला. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमध्ये राज सईच्या बाबांची म्हणजेच सागर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. राजच्या या नव्या भूमिकेची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. याशिवाय अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो.

हेही वाचा : “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…”, बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

अभिनेता राज हंचनाळेने खऱ्या आयुष्यात मनीषा ऊर्फ मॉली डेस्वाल हिच्याशी २०१९ मध्ये लग्न केलं. दोघंही २०१३ पासून एकमेकांना डेट करत होते. सध्या राजने बायकोबरोबर केलेल्या हटके वर्कआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “या पृथ्वीवरची सगळ्यात भयानक जागा”; राज कुंद्राने सांगितली आर्थर रोड तुरुंगातील आठवण, म्हणाला…

राजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या बायकोसह इमारतीचे २१ मजले एका झटक्यात चढताना दिसत आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने “यशासाठी कोणतीही लिफ्ट नाही तर तुम्हाला पायऱ्या चढाव्या लागतात” असं कॅप्शन दिलं आहे. राजच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या या हटके वर्कआऊट व्हिडीओचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : भगरे गुरुजींच्या लेकीने पुण्यात सुरू केलं हॉटेल, नाव आणि सजावटीने वेधलं लक्ष, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज हंचनाळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर २०१६ ते २०२१ या दरम्यान सुरू असलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत अभिनेत्याने सन्नीदा ही भूमिका साकारली होती. पुढे, २०२२ मध्ये ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत राज झळकला आणि सध्या तो ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.