लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखलेंनी आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळा असा ठसा उमटवला आहे. मोठ्या पडद्यापासून ते छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणून शुभांगी गोखलेंना ओळखलं जातं. सध्या त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांनी साकारलेली माधवी गोखले ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. नुकताच त्यांनी ‘ढिंचॅक दिवाळी २०२३’च्या निमित्ताने एका एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवंगत लोकप्रिय अभिनेते, पती मोहन गोखले यांच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा – “या मालिकेमुळे मुलांवरती वाईट संस्कार पडत आहेत…” ‘आई कुठे काय करते’चा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले…

हेही वाचा – प्रवीण तरडेंच्या पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “धकाधकीच्या जीवनात…”

‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलशी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना मोहन गोखलेंबरोबरच्या दिवाळीची एखादी आठवण? त्यांना काय आवडायचं? याविषयी विचारलं. तेव्हा शुभांगी गोखले म्हणाल्या की, “एकांतात माणसं असतात तशाच प्रकारे तो होता, फार रममाण न होणारा. पण बाकीचे एन्जॉय करत असतील तर थोडासा त्याचा सहभाग असायचा. मात्र दिवाळी आहे, आपण हे करू किंवा ते करू असं नाही. त्याची वर्षभरच दिवाळी होती. खरेदी म्हणा, लोकांच्या भेटीगाठी म्हणा, कोणाला भेटवस्तू देणे या सगळ्या गोष्टी त्याच्या वर्षभर चालायच्या.”

पुढे शुभांगी गोखले म्हणाल्या की, त्यानी मला दर पाडव्याला उत्कृष्ट भेटी दिल्या आहेत. जेव्हा सखी झाली होती तेव्हा दिवाळीला तो कोलकातामध्ये होता. त्याने तिथून मला साडी पाठवली होती. पाडव्याला त्याने मला खूप सुंदर भेटी दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘ही’ लाडकी जोडी घेणार निरोप; सव्वा तीन वर्षांचा प्रवास संपणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘श्वेतांबरा’ या मालिकेतून मोहन गोखलेंनी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘मिस्टर योगी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले मोहन यांनी ‘हिरो हिरालाल’, ‘मोहन जोशी हाजीर हो’ या सारख्या अनेक चित्रपटात अजरामर भूमिका केल्या. त्यावेळी मोहन गोखले प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मात्र, वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. चेन्नईत ‘हे राम’च्या चित्रीकरणासाठी गेलेले मोहन २९ एप्रिल १९९९ रोजी काळाच्या पडद्याआड गेले आणि सिनेसृष्टीने एक उत्कृष्ट अभिनेता गमावला.