‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सध्या खूप चर्चेत आहे. या चर्चेचं कारण म्हणजे तेजश्री प्रधान. काही दिवसांपूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून तेजश्री प्रधानची अचानक एक्झिट झाली. ज्यामुळे चाहत्यांना धक्काच बसला. आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीची जागा स्वरदा ठिगळेने घेतली आहे. अभिनेत्री स्वरदा मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील हा मोठा बदलं अजूनही प्रेक्षकांनी स्वीकारलेला दिसत नाहीये. सतत मालिकेच्या प्रोमोवर नेटकरी जुनी मुक्ता पाहिजे, तेजश्रीची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, असं म्हणताना दिसत आहेत. पण, याकडे दुर्लक्ष करून स्वरदा मुक्ताच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देताना पाहायला मिळत आहे. नुकताच स्वरदाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामधील तिची एक वेगळी बाजू पाहून सगळे आश्चर्य चकीत झाले आहेत.

‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या आगामी भागात ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘उदे गं अंबे’ मालिकेची टीम सांगीतिक लढत खेळताना दिसणार आहे. याच कार्यक्रमातील नव्या मुक्ताचा म्हणजे स्वरदा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्वरदा एरियल योग करताना दिसत आहे. तसंच ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांना जेव्हा स्वरदा योग शिकवायला जाते, तेव्हा नायक धडपडताना पाहायला मिळत आहेत. स्वरदाचा हा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून चांगलाच चर्चेत आला आहे. स्वरदाचं या विशेष कौशल्याचं नेटकरी कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा २ फेब्रुवारीला महाएपिसोड रंगणार आहे. या महाएपिसोडचा प्रोमो अलीकडेच ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये सावनीचं नवं कारस्थान पाहायला मिळत आहे. आदित्यच्या कस्टडीच्या बदल्यात सावनी सईला घेऊन जाताना दिसत आहे. पण, यावेळी सई सावनीच्या हाताला चावते आणि मुक्ताकडे धावत येऊन तिला मिठी मारते. तेव्हा मुक्ता म्हणते, “हा एक कागदाचा तुकडा माझ्या या काळजाच्या तुकड्याला कधीच दूर करू शकणार नाही.” त्यानंतर मुक्ता सईला घट्ट मिठी मारताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सईच्या कस्टडीची कायदेशीर लढाई मुक्ता-सागर कसे लढताना? आणि सावनीचा हा नवा डाव कसा हाणून पाडतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.