अभिनेत्री तेजश्री प्रधान जवळपास दोन वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. यापूर्वी तिच्या ‘अग्गं बाई सासूबाई’, ‘होणार सून मी या घरची’ या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून तेजश्री येत्या ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री ‘मुक्ता’ हे पात्र साकारणार आहे. या मुक्ताचा स्वभाव नेमका कसा आहे? याबद्दल तेजश्रीने स्वत: खुलासा केला आहे.

हेही वाचा : आजारी बायकोसाठी उमेश कामतने बनवला शिरा; प्रिया बापट चवीबद्दल म्हणाली…

तेजश्री भूमिकेविषयी सांगताना म्हणाली, “मुक्ता हे पात्र प्रेक्षकांना नक्की आवडेल. प्रत्येकाला आवडेल असा तिचा स्वभाव आहे. मुक्ताची आई शाळेतील उपमुख्याध्यापिका असते त्यामुळे आईला घाबरणारी आणि बाबांची ती खूप लाडकी आहे. चुकणारी, हसणारी, रडणारी आणि सर्वांना सांभाळून घेणार अशी आहे मुक्ता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात ती प्रचंड सकारात्मक आहे.”

हेही वाचा : “…आणि हे मी यापुढे कधीच करणार नाही,” शाहरुख खानचं ‘जवान’ चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य

“मुक्ताला आई-बाबांचा धाक असला, तरी आपलं मत ती फार मोकळेपणाने मांडते. ‘जर कोणतीही व्यक्ती आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार करणार असेल, तर ते प्रेम आहे.’ ही मुक्तासाठी प्रेमाची व्याख्या आहे.” असं तेजश्री प्रधानने सांगितलं.

हेही वाचा : “मला जराही भीती…”, ‘जवान’मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी शाहरुख खानला दिलं चोख प्रत्युत्तर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून संध्याकाळी ८ वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तेजश्री प्रधान, राज हंसनाळे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्या व्यतिरिक्त शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार सुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारतील.