छोट्या पडद्यावरील मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरांत लोकप्रिय झाली. आता तेजश्री जवळपास दोन ते अडीच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अभिनेत्री नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ येत्या ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : “मला अभिनेता म्हणून माझ्याच कंपनीत काम मिळत नाही”; करण जोहरने व्यक्त केली खंत

तेजश्रीने ‘होणार सून मी ह्या घरची’मध्ये ‘जान्हवी’, तर ‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये ‘शुभ्रा’ची व्यक्तिरेखा साकारली होती. आता नव्या मालिकेत अभिनेत्री ‘मुक्ता’ हे पात्र साकारणार आहे. तिने साकारलेल्या या तिन्ही पात्रांमध्ये काय साम्य आहे? तसेच तेजश्री खऱ्या आयुष्यात कशी आहे? याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video: “आईच्या निधनानंतर राखी बिर्याणी खात होती”, आदिल खानने दाखवला व्हिडीओ; म्हणाला, “आईचं पार्थिव…”

तेजश्री म्हणाली, “मी साकारलेल्या सगळ्याच भूमिका माझ्या खूप जवळच्या आहेत. मुक्ताची भूमिका साकारताना मला कधीच विरोधाभास जाणवत नाही कारण, मी आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं काहीतरी म्हणणं असतं. ज्या सहनशील आहेत किंवा ज्यांच्यावर सतत अत्याचार होतात अशा भूमिका मी केल्या नाहीत. खऱ्या आयुष्यातही मी अशीच आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहणं, पूर्वला पूर्व दिशाचं म्हणणं हा स्वभाव माझाही आहे.”

हेही वाचा : ‘प्यार का पंचनामा’मध्ये नुसरत भरुचाने बिकिनी घालण्यास दिलेला नकार, कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जान्हवी, शुभ्रा किंवा आता मुक्ता असो…या अभिनेत्री कितीही प्रेमळ आणि छान वागणाऱ्या असल्या तरीही त्या नेहमी सत्य पडताळून वागतात. त्यामुळे अशा व्यक्तिरेखा साकारणं अवघड जात नाही.” असं तेजश्रीने सांगितलं. दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून संध्याकाळी ८ वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तेजश्री प्रधान, राज हंसनाळे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.