‘बिग बॉस’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे राहुल महाजन. सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. राहुल महाजन लवकरच त्याची तिसरी पत्नी नताल्या इलिनापासून घटस्फोट घेणार आहे. राहुल आणि नताल्या या दोघांनी वर्षभरापूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या घटस्फोटाला कायदेशीररित्या मान्यता देण्यात आलेली नाही.

‘ई टाईम्स’ने विश्वासनीय सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि नताल्या या दोघांमध्ये लग्न झाल्यापासून खटके उडत होते. पण ते दोघेही त्यांचं लग्न टिकवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात सतत वाद होत आहेत. त्यामुळेच त्या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा : Video : “परदेशात बसून धमक्या…” दाऊद इब्राहिमबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर समीर वानखेडेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले “खूप लहान गुन्हेगार…”

राहुल आणि नताल्या हे दोघेही वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. त्या दोघांनी गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे, अशीही माहिती ई-टाईम्सने दिली आहे.

याप्रकरणी राहुल महाजन याला विचारणा करण्यात आली असता त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. “मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी खासगी ठेवायच्या आहेत. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीवर भाष्य करायचे नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे यावर मी माझ्या मित्रांबरोबरही चर्चा करत नाही”, असे राहुलने यावेळी म्हटले. तर नताल्याने याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही.

आणखी वाचा : “आताच मला बायकोने दम दिलाय की…” अशोक सराफ यांचा पत्नी निवेदिता सराफ यांच्याबद्दल खुलासा, म्हणाले “घरी तर…”

दरम्यान नताल्या ही राहुलची तिसरी पत्नी आहे. त्या दोघांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली. याआधी राहुल २००६ मध्ये श्वेता सिंहबरोबर लग्नबंधनात अडकला होता. श्वेता ही राहुलची खूप चांगली मैत्रीण होती. मात्र श्वेताने राहुलवर मारहाणीचा आरोप करत २००७ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. राहुल आणि श्वेता २००८ मध्ये वेगळे झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वेताबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर राहुलने २०१० मध्ये प्रसिद्ध मॉडेल डिंपी गांगुलीशी लग्न केले. डिंपी आणि राहुलची भेट एका स्वयंवर शोमध्ये झाली होती. त्यानंतर डिंपी आणि राहुलचे नातेही जास्त काळ टिकले नाही. तिने त्याच्यावर मारहाणीचा आरोप करत २०१५ मध्ये घटस्फोट घेतला.