ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमी तिच्या वेगळ्या अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतंच तिनं टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. आता राखी पुन्हा एकदा पतीच्या शोधात असल्याचं समोर आलं आहे. रितेश आणि आदिल खाननंतर तिसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत राखीनं असं काही कृत्य केलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण राखीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फी जावेदशी केली आहे.

राखी सावंतचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखी भर पावसात स्वतःच्या डोक्यावर अंडी फोडताना दिसत आहे. तसेच हे करताना राखी म्हणत आहे की, “चांगला पती मिळू देत. बाबा मी सगळी अंडी फोडली, पती कुठे आहे,” अशी विचारणा करताना दिसत आहे. याबाबत पापाराझींबरोबर बोलताना राखीनं सांगितलं की, “जर मी स्वतःच्या डोक्यावर ५ अंडी फोडून घेतली तर मला चांगला पती मिळेल. जो माझ्याशी चुंबकाप्रमाणे चिटकून राहील आणि आमचं नातं कायम टिकून राहील, असं मला एका बाबानं सांगितलं आहे.”

हेही वाचा – ‘बवाल’ आणि ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं काय आहे कनेक्शन? बॉयकॉटची होऊ लागली मागणी

हेही वाचा – लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभू अभिनय क्षेत्रातून घेणार ब्रेक; कारण…

राखीचा या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यांनं राखीची तुलना उर्फीशी करत लिहिलं आहे की, “हिच्यापेक्षा उर्फी बरी आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “हिला मानसोपचारतज्ज्ञाला भेटण्याची गरज आहे.” तसेच तिसऱ्यानं लिहिलं की, “ही खूप चांगली आहे. पण अशाप्रकारे अन्न वाया घालवताना पाहून खूप वाईट वाटतंय. जगात दुसऱ्या बाजूला लोकांना खायला मिळत नाहीये.”

हेही वाचा – संजय दत्तचा ‘त्या’ गाण्यावरील डान्स पाहून सरोज खान खुर्चीवरून पडल्या होत्या खाली; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राखीनं आदिल खानशी लपूनछपून लग्न केलं होतं. पण अवघ्या काही महिन्यात राखीनं आदिलवर कौंटुबिक हिंसाचार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला. ज्यानंतर तिनं आदिलबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सध्या आदिल हा जेलमध्ये असून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.