बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला अटक करण्यात आली आहे. मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो व्हायरल केल्याप्रकरणी राखीला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. शर्लिननेच राखीला अटक केल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली.

राखीला अटक झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘टाइम्स नाऊ डिजिटल’शी बोलताना राखीचा भाऊ राकेश यांनी शर्लिनविरोधात तक्रार करणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “राखीने कोणाताही गंभीर गुन्हा केलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीबाबत पोलिसांनी राखीला चौकशीसाठी बोलवलं होतं. परंतु, तिच्या आईची प्रकृती बरी नसल्याने तिला पोलीस ठाण्यात जाता आलं नाही. त्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. आता राखीबरोबर काही नातेवाईक, वकील व तिचा पती आदिल खानही आहे”.

हेही वाचा>> हनिमूनआधी राखी सावंत आदिल खानसह उमराहला जाणार, स्वत:च केला खुलासा, म्हणाली…

राखीचा भाऊ राकेश यांनी शर्लिन चोप्रावर आरोप केले आहेत. “शर्लिनसारख्या अभिनेत्रींमुळे पालक त्यांच्या मुलींना कलाविश्वात करिअर करण्यापासून रोखतात. शर्लिन तुझ्याकडून या क्षेत्रातील नवीन मुलं काय आदर्श घेतील?”, असंही ते पुढे म्हणाले. शर्लिन चोप्राविरोधात लवकरच तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही पाहा>> Photos: अभिनेत्रीचा ‘तो’ एक व्हिडीओ आणि राखी सावंतला अटक, नेमकं प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतने यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळून लावल्याने आज राखीला अटक करण्यात आली.