scorecardresearch

Video: मारहाण, पैसे चोरल्याचा आरोप केल्यानंतर राखी सावतंची आदिल खानबरोबर डिनर डेट, नवऱ्याला भरवला घास अन्…; व्हिडीओ व्हायरल

राखी सावतंची आदिल खानबरोबर डिनर डेट, व्हिडीओ व्हायरल

rakhi sawant adil khan dinner date
राखी सावंत-आदिल खानची डिनर डेट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईचं निधन झालं. त्यानंतर आता राखीच्या संसारात वादळ आलं आहे. पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा राखीने केला होता. आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव जाहीर केल्यानंतर त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते.

आदिलवर राखीने अनेक आरोपही केले होते. आईच्या उपचारासाठी वेळेवर पैसे न दिल्याचं म्हणत तिच्या मृत्यूला आदिल जबाबदार असल्याचं राखी म्हणाली होती. शिवाय आदिलने मारहाण केल्याचा आरोपही तिने केला होता. याबरोबरच माझ्याकडचे पैसे व माझे दागिनेही आदिलने घेतल्याचा खुलासा राखीने कॅमेऱ्यासमोर केला होता. आदिल मला सोडून त्याची गर्लफ्रेंड तनुकडे राहायला गेल्याचंही राखी म्हणाली होती. या ड्राम्यानंतर आता राखी व आदिलचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा>> “मी नमाज पठण करत असताना आदिलने लाथेने…”, राखी सावंतने सांगितला ‘तो’ प्रसंग

पती आदिलवर आरोप केल्यानंतर राखी सावंतने हॉटेलमध्ये त्याच्याबरोबरच बसून रात्रीचं जेवण केलं. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन राखी व आदिलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी व आदिल बाजूबाजूला बसून जेवताना दिसत आहेत. त्यानंतर राखी व आदिलने एकमेकांना घास भरवल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओवर राखीने कमेंटही केली आहे. “आदिल माफी मागायला आला होता, परंतु मी माफ केलं नाही”, असं राखीने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> स्मृती इराणींच्या मुलीचं नाव शाहरुख खानने ठेवलं? खुलासा करत म्हणाल्या…

हेही पाहा>> “माझे सर्व पैसे आदिल खानने घेतले”, राखी सावंतचे पतीवर धक्कादायक आरोप; म्हणाली “माझा शारीरिक अन्…”

राखी व आदिलने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांनी निकाहही केला होता. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. अनेक दिवस ड्रामा केल्यानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:10 IST
ताज्या बातम्या