राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा पती आदिल खान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. आदिल खानशी लग्न करण्यासाठी राखी इस्लाम धर्म स्वीकारला होता. पतीच्या आरोपांनंतर राखी उमराह करण्यासाठी मक्का-मदीना गेली होती. ती आता मुंबईत परतली आहे.

“फातिमा नाही तर झॉम्बी”, उमराहवरून परतलेल्या राखीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “मुंबईत आल्यावर तिचा बुरखा…”

राखी सावंत मुंबईत परतल्यावर ‘मला राखी नाही तर फातिमा म्हणा’, असं वक्तव्य तिने केलं. यानंतर अचानक मीडियाने तिला हिंदू धर्माबाबत असा प्रश्न विचारला की त्याचं उत्तर देण्यासाठी राखी काही क्षण विचारात पडली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. थोडा वेळ विचार केल्यानंतर राखीने उत्तर दिलं.

“मुलाला हात लावण्याआधी…”, ‘जवान’मधील शाहरुख खानचा ‘तो’ डायलॉग ऐकून नेटकऱ्यांना आठवले समीर वानखेडे; म्हणाले…

‘हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाम धर्म स्वीकारलास’, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर राखी म्हणाली, “हिंदू धर्मात कधीच काही चुकीचं, वाईट नव्हतं. मी मुस्लिमाशी लग्न केलं, निकाह केला होता, त्यामुळे जेव्हा तुम्ही निकाह करता तेव्हा तुम्हाला इस्लाम कबूल करावा लागतो. मी मागच्या वर्षभरापासून विवाहित आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला मक्का-मदीना जायला मिळालं.”

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेक यूजर्स कमेंट करत राखीला ट्रोल करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘ती कधीच हिंदू नव्हती, ती आधीच ख्रिश्चन होती.’ आणखी एक युजर म्हणाला, ‘तिचे लग्न झाल्यावर ती मुस्लीम झाली, आता तिचा घटस्फोट झाला तर ती ख्रिश्चन होईल.’