scorecardresearch

‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना गरोदर होती राखी सावंत; प्रेग्नन्सीबाबत अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

राखी सावंतचा गरोदरपणाबाबत मोठा खुलासा, म्हणाली…

‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना गरोदर होती राखी सावंत; प्रेग्नन्सीबाबत अभिनेत्रीचा गौप्यस्फोट
राखी सावंतचा गरोदरपणाबाबत मोठा खुलासा. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर राखीने सात महिन्यांपूर्वीच लग्न केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राखी गरोदर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, राखीने यावर भाष्य करणं टाळलं होतं.

राखी सावंतच्या गरोदरपणाबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. ‘विरल भय्यानी’ या पापाराझीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन राखीच्या गरोदरपणाबाबत माहिती देण्यात आली आहे. यानुसार, राखी गरोदर असल्याच्या बातमीला पुष्टी देण्यात आली आहे. खुद्द राखीनेच तिच्या गरोदरपणाबाबत माहिती दिली असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.

हेही वाचा>> राखी सावंतच्या मदतीला मुकेश अंबानी आले धावून, अभिनेत्री आभार मानत म्हणाली…

हेही वाचा>> ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

“हो मी गरदोर होते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही हे मी सांगितलं होतं. पण घरातील सदस्यांनी ते गांभीर्याने घेतलं नाही. मी जोक करतेय असं म्हणत त्यांनी हसण्यावारी घेतलं”, असं राखी म्हणाल्याचं पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसंच राखीचा गर्भपात झाल्याचंही तिने सांगितलं असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. राखीच्या गरोदरपणाच्या बातमीमुळे आता पुन्हा ती चर्चेत आली आहे.

हेही वाचा>> प्रतीक्षा संपली! पोस्टर, रावणाचा लूक, व्हिएफएक्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘आदिपुरुष’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

दरम्यान, राखी सावंत सध्या अडचणीत आहे. तिची आई रुग्णालयात गंभीर आजाराचा सामना करत आहे. राखीच्या आईला कॅन्सर झाला असून त्यांना पक्षाघातही झाला आहे. आईच्या उपचाराच्या खर्चासाठी मदत करण्याचं राखीने आवाहन केल्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी तिला मदत करणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 14:14 IST

संबंधित बातम्या