ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच वादंग निर्माण झाला होता. चित्रपटातील रावणाच्या लूकवरुनही ‘आदिपुरुष’ला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर चित्रपटातील व्हिएफएक्स बदलण्यात आल्याची चर्चाही रंगली होती.

‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता प्रभासने आदिपुरुष चित्रपटाचं पोस्टर शेअर करत एक पोस्ट केली होती. या चित्रपटाच्या पोस्टरवर प्रदर्शनाच्या तारखेबाबत अपडेट देण्यात आली आहे. ‘१५० दिवस बाकी’ असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. त्यानुसार ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा>>‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

हेही वाचा>> रितेश देशमुखने मनसे नेत्याच्या मुलाकडे केली ‘वेड लावलंय’ गाण्यावर व्हिडीओ बनवण्याची मागणी; पुढे काय घडलं पाहा

प्रभासने ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत “रामकार्य करण्यासाठी सदैव तत्पर आहोत”, असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. आता ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पण त्यासाठी प्रेक्षकांनी १६ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा>>‘घर मोहे परदेसिया’ गाण्यावर थिरकली मुकेश अंबानींची धाकटी सून; मेहेंदी सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन सीता आणि अभिनेता सनी सिंह लक्ष्मणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेही ‘आदिपुरुष’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो हनुमानाच्या भूमिकेत आहे.