८०-९०च्या दशकातील छोट्या पडद्यावरील ‘रामायण’ मालिका विशेष गाजली. लॉकडाऊनच्या काळातही ही मालिका टीव्हीवर पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. या मालिकेतील कलाकरांवर आजही प्रेक्षक तितकंच प्रेम करतात. अभिनेत्री दीपिका चिखलियाही याच मालिकेतून घराघरात पोहोचल्या. या मालिकेत त्यांनी सीताची भूमिका साकारली होती.

‘रामायणा’त सीता पात्र साकारुन लोकप्रियता मिळवलेल्या दीपिका यांचा आज वाढदिवस आहे. ‘विक्रम वेताळ’ या रामानंद सागर यांच्या मालिकेत दीपिका काम करत होत्या. तेव्हाच त्यांना दिग्दर्शक ‘रामायण’ मालिका सुरू करणार असल्याचं कळलं. त्यांनी ‘रामायणा’साठी ऑडिशनही दिलं होतं. ‘रामायण’ मालिकेत काम करण्यापूर्वी दीपिका अनेक चित्रपटांतही झळकल्या होत्या.

हेही वाचा>> मुख्यमंत्र्यांच्या लेकाशी लग्न, वर्षभरातच पतीचं निधन अन्…; किशोर कुमार यांच्याशी दुसऱ्यांदा विवाह करताना सात महिन्यांची गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री

‘रामायण’ मालिका करण्यापूर्वीच दीपिका यांना हॉलिवूड चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. इतर चित्रपटांमुळे त्यांना हॉलिवूडची ऑफरही आली होती. दीपिका यांच्या एका मैत्रिणीने याबाबत मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता.

हेही वाचा>> शिव ठाकरे प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट? डेटिंगच्या चर्चांवर खुलासा करत म्हणाली, “तो खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दीपिकाला हॉलिवूड चित्रपटासाठी मोठी रक्कम मानधन म्हणून मिळणार होती. २० हिंदी चित्रपट करुन तिला जितके पैसे मिळाले असते तेवढं मानधन तिला एका हॉलिवूड चित्रपटासाठी मिळत होतं. परंतु, दीपिकाला या चित्रपटात अंगप्रदर्शन करावं लागणार होतं. पण तेव्हा तिने ‘रामायणा’त सीतेचं पात्र साकारण्याचं निर्णय घेतला होता, त्यामुळे दीपिकाने हॉलिवूड चित्रपट नाकारला,” असं त्यांच्या मैत्रिणीने सांगितलं होतं.