छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ओटीटी माध्यमांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असली तरी आजही घरोघरी टेलिव्हिजन मालिका पाहिल्या जातात. मालिकांमध्ये काम करणारे कलाकार प्रेक्षकांना पटकन जवळचे वाटू लागतात. स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेचे चाहते आजही प्रत्येक पात्राची आठवण काढतात. परंतु, आता ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील बहुतांश कलाकार नव्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमांतून प्रेक्षकांसमोर येत आहेत.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री विदिशा म्हसकर लवकरच कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : सर्वात फ्लॉप अभिनेत्री! १९ वर्षी पदार्पण, ३८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह रोमान्स; सगळे चित्रपट फ्लॉप तरी मिनिटाला घेते कोटींमध्ये फी

‘भाग्य दिले तू मला’ या छोट्या पडद्यावरील मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अभिनेत्री तन्वी मुंडले (कावेरी), अभिनेता विवेक सांगळे (राजवर्धन) आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ (रत्नमाला) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता लवकरच या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री विदिशा म्हसकरची एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा : ना गाडी, ना विमान…; देवदर्शनाला निघालेल्या बांदेकर कुटुंबीयांनी केला रेल्वे प्रवास! साधेपणाचं सर्वत्र होतंय कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
vidisha
विदिशा म्हसकर

विदिशा या मालिकेत राजवर्धनच्या नव्या बॉसची भूमिका साकारणार आहे. ‘रंग माझा वेगळा’नंतर विदिशाला एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान, ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत तन्वी, विवेक आणि निवेदिता सराफ यांच्यासह अमित रेखी, पूर्वा फडके, जान्हनी किल्लेकरने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर दररोज रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जाते.