‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका चांगलीच गाजली होती. साडे तीन वर्षांहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या वर्षी ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेतील कलाकार वेगवेगळ्या मालिकेतून वेगळ्या रुपात पाहायला मिळत आहेत. अशातच ‘रंग माझा वेगळा’मधील आदित्य म्हणजेच अभिनेता अंबर गणपुलेने अभिनेत्री शिवानी सोनारसह गुपचूप साखरपुडा उरकला. या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काल (९ एप्रिल) अभिनेता अंबर गणपुले व शिवानी सोनार यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. याचे फोटो, व्हिडीओ इतर कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर करून दोघांना शुभेच्छा दिल्या. नुकतीच शिवानीने देखील साखरपुड्याची पोस्ट केली आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्री ‘मेड इन इंडिया’ फेम मिलिंद सोमणबरोबर झळकणार, फोटो शेअर करत म्हणाली…

साखरपुड्याचे फोटो शेअर करत शिवानीने लिहिलं आहे, “अलेक्सा प्लीज प्ले, एक दिन आप यूं हमको मिल जायेंगे. #Ambani.” शिवानी व अंबरने साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. शिवानी पांढऱ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात पाहायला मिळाली. तर अंबरने निळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न आउटफिट परिधान केला होता. शिवानी व अंबर खूपच सुंदर दिसत होते.

शिवानीच्या या साखरपुड्याच्या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षावर केला आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटे, ऋतुजा देशमुख, ऋचा आपटे, सुकन्या मोने, सुयश टिळक, अनघा अतुल, आरती मोरे अशा अनेक कलाकारांनी शिवानी व अंबरला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: सुबोध भावेने ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर, म्हणाला, “मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिवानी व अंबरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, शिवानीची अलीकडे ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका ऑफ एअर झाली. या मालिकेत शिवानीने सिंधुताई सकपाळ यांची भूमिका साकारली होती. तसेच अंबर ‘रंग माझा वेगळा’नंतर ‘लोकमान्य’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत अंबर गोपाळ गणेश आगरकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता.