मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार गेले काही दिवस अभिनयाबरोबरच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य देत आहेत. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, अभिनेता निरंजन कुलकर्णी, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे या कलाकार मंडळींनी काही दिवसांपूर्वीच हॉटेल व्यवसायात आपलं पाऊल टाकलं. आता यामध्ये ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलचा समावेश झाला आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनघाने नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती.

हेही वाचा : नुसरत भरुचाप्रमाणे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेत्री अडकली असती इस्रायलमध्ये, पण…

‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुल ही भगरे गुरूजी यांची कन्या आहे. भावाच्या जोडीने अभिनेत्रीने पुण्यातील डेक्कन परिसरात ‘वदनी कवळ’ शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरु केलं आहे. हॉटेलच्या कामाचे फोटो तिने गणेश चतुर्थीला सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अनघाने तिच्या सोशल मीडियावर तिच्या नव्या हॉटेलची पहिली झलक शेअर केली आहे. काम पूर्ण झाल्यावर लवकरच हे हॉटेल सामान्य लोकांसाठी सुरू होईल.

हेही वाचा : Video: ४ महिला, डोंगराळ प्रदेश, ७ दिवसांचा बाईक प्रवास अन्…; ‘धक धक’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित

सध्या अनघाच्या हॉटेलमध्ये इंटिरियरचं काम सुरू आहे. ‘वदनी कवळ’ असं तिच्या नव्या हॉटेलचं नाव असून याठिकाणी येणाऱ्या खवय्यांना अस्सल पारंपरिक थाळीचा आस्वाद घेता येईल असं अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिचा भाऊ अखिलेश भगरेच्या जोडीने अभिनेत्रीने हा नवा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा : होणार सून मी ह्या घरची: शशांक केतकरने सांगितला रोहिणी हट्टंगडी यांच्या व्हॅनिटी व्हॅनचा किस्सा, म्हणाला, “त्या सेटवर…”

anagha atul
अनघा अतुल

हॉटेलमध्ये इंटिरियरचं काम सुरू असताना अनघाने स्वत: पुढाकार घेऊन रंगकाम केल्याचा फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो. कलाविश्वातील असंख्य मित्र-मैत्रिणी आणि तिच्या चाहत्यांनी या नव्या हॉटेलसाठी अनघाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनघा अतुल ‘रंग माझा वेगळा’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. यामध्ये तिने श्वेता हे खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेने गेल्या महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतला.