काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल चार वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. १०००हून अधिक भाग या मालिकेचे झाले. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. दीपा, कार्तिक, सौंदर्या इनामदार, आयेश, श्वेता ही सगळी पात्र घराघरात पोहोचली होती. त्यामुळे मालिका संपल्यानंतर ही पात्र निभावणारे कलाकार कोणत्या नव्या रुपात पाहायला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून होतं. अशातच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या मालिकेतील एका अभिनेत्रीनं आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच ती नव्या रुपात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – ‘आरआरआर’नंतर एसएस राजामौली यांनी दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकची केली घोषणा; काय असणार चित्रपटाचं नाव?

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिक म्हणजेच अभिनेता आशुतोष गोखले याचं सध्या रंगभूमीवर एक नाटक गाजत आहे. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून आशुतोष प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे सध्या वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता श्वेता अर्थात अभिनेत्री अनघा अतुल ‘रंग माझा वेगळा’ मालिकेनंतर हॉटेल व्यवसायात पदार्पण करत आहे. याबाबत तिनं नुकताच सोशल मीडियाद्वारे खुलासा केला आहे.

हेही वाचा – सुबोध भावेच्या मुलांनी बाप्पासाठी केला आकर्षक ‘चांद्रयान ३’चा देखावा; पाहा फोटो

अनघानं काही फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा ॥….असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरुवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहुन मंगल दिवस नाही. गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोए, “आता पुढे काय?” तर यापुढे पुणेकरांच्या हृदयात थोडी जागा निर्माण करायचं ठरवलंय….मी आणि माझा भाऊ घेऊन येतोए “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण. पुण्यातील डेक्कन येथे…लवकरच येतेय तुमच्या भेटीला.”

हेही वाचा – राखी सावंतने आदिल खानबरोबरच्या लग्नाचे सर्व पुरावे केले उघड; म्हणाली, “मी इस्लाममधील नियमांचं पालन केलं अन् आता…”

पुढे अनघानं लिहीलं की, “खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.”

हेही वाचा – Ganesh Chaturthi 2023: ढोल ताशांच्या गजरात ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरच्या बाप्पाचं आगमन; पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार”; गायक सलील कुलकर्णींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्रीच्या या पोस्टनंतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता मंदार जाधव, सुयश टिळक, साक्षी गांधी, अश्विनी कासार, गिरीजा प्रभू, अक्षर कोठारी अशा अनेक कलाकारांनी तिला पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.