scorecardresearch

दाक्षिणात्य, हिंदीपाठोपाठ रश्मिका मंदाना झळकणार मराठी चित्रपटात?; म्हणाली…

तिचं हे उत्तर ऐकून तिचे चाहतेही खूप खुश झाले.

rashmika mandanna marathi film

आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचं फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसंच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. तर त्यानंतर काही महिन्यांपूर्वी तिने ‘गुडबाय’ या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करून तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. तर त्या पाठोपाठ ती मराठी चित्रपटांमध्येही काम करताना दिसणार का? या प्रश्नाचं आता तिने स्वतः उत्तर दिलं आहे.

रश्मिका मंदाना नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यामध्ये सहभागी झाली होती. काल हा पुरस्कार सोहळा प्रसारित झाला. तिने नुसतीच कार्यक्रमामध्ये हजेरी नाही लावली तर या कार्यक्रमात तिने लावणीही सादर केली. या कार्यक्रमातील तिसरा डान्स पाहून सर्वच जण भारावून झाले. तर हा परफॉर्मन्स झाल्यानंतर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असलेला निलेश साबळे याने तिच्याशी संवाद साधला.

आणखी वाचा : Video: …अन् श्रीवल्ली मराठीत बोलू लागली, रश्मिका मंदानाचा मराठमोळा अंदाज चर्चेत

निलेश साबळे याने रश्मिकाला मराठीमध्ये काही प्रश्न विचारले. तर रश्मिकाने देखील त्या प्रश्नांची मराठीत उत्तरं दिली. यावेळी निलेशने तिला विचारलं “तुला मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल का?” यावर रश्मिका म्हणाली, “चांगली कथा असेल तर नक्कीच करेन.” तिच्या या उत्तराने सर्वांचंच मन जिंकलं. तिचं हे उत्तर ऐकून तिचे चाहतेही खूप खुश झाले.

हेही वाचा : Video: रश्मिका मंदानाला पाहून श्रेयस तळपदे फिदा; म्हणाला, “सिर्फ मेरेकु देखि नहीं…”

त्यामुळे दक्षिणात्य चित्रपट, हिंदी चित्रपट यानंतर रश्मिका मंदाना खरोखरच भविष्यात मराठी चित्रपटामध्ये झळकणार का हे पाहण्यासाठी आता सर्वजण उत्सुक झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 14:06 IST

संबंधित बातम्या