Rasika Wakharkar and Indraneil Kamat Sung Song: अभिनेत्री रसिका वाखारकर सध्या अशोक मा.मा. या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या मालिकेत दिग्गज अभिनेते अशोक सराफ प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

रसिकाने या मालिकेत भैरवी ही भूमिका साकारली आहे. आता ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेत एक नवीन एन्ट्री होणार आहे. अभिनेता इंद्रनील कामतची मालिकेत एन्ट्री होणार आहे. या मालिकेत अभिनेता अर्जुन ही भूमिका साकारणार आहे. विशेष बाब म्हणजे रसिका व इंद्रनील यांनी याआधीही एकत्र काम केले आहे. ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत हे कलाकार मुख्य भूमिकांत दिसले होते.

‘ही चाल तुरू तुरू’ हे ५० वर्षे जुने गाणे गात रसिका वाखारकर व इंद्रनील कामतने जिंकली चाहत्यांची मने

आता रसिका व इंद्रनील हे त्यांच्या मालिका किंवा भूमिकांमुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. इंद्रनील व रसिकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

इंद्रनील व रसिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी एक मराठी लोकप्रिय गाणे गात असल्याचे पाहायला मिळत आहे. या कलाकारांनी ही चाल तुरू तुरू हे गाणे गायले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिचे गाणे बिघडवण्यासाठी इथे आलो आहे, अशा आशयाची कॅप्शन इंद्रनीलने दिली आहे. त्यांचे हे गाणे ऐकल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कलाकारांचे कौतुक केले आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले, “किती गोड”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “अरे वाह! जमलंय जमलंय”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “रसिका-इंद्रनील खूप छान”. एका नेटकऱ्याने या कलाकारांचे कौतुक करीत लिहिले, “तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंद झाला”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “दोघे एकत्र मस्त दिसता.” एका नेटकऱ्याने लिहिले, “तुमची जोडी खूप छान दिसते. खऱ्या आयुष्यातसुद्धा बघायला खूप आवडेल”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशोक. मा. मा. या मालिकेत अर्जुन हा भैरवीचा बॉस असणार आहे. तसेच, तो भैरवीचा जुना मित्रदेखील आहे. त्यामुळे आता काय ट्विस्ट येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.