मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकार स्वत:चं मूळ गाव, शहर सोडून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले आहेत. स्वत:च्या घरापासून लांब आल्यावर मुंबईत हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांची ही इच्छा पूर्ण होत आहे. कलाविश्वात संघर्ष करून तसेच स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करून अलीकडेच सई ताम्हणकर, ऋतुजा बागवे, स्मिता शेवाळे, प्राजक्ता माळी, मीरा जोशी यांनी नवीन घरं घेतली. आता यामध्ये छोट्या पडद्यावरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या कृतिका तुळसकरची भर पडली आहे.

हेही वाचा : “माझ्या प्रिय बाळा!”, मुलांच्या जेवणाच्या डब्यासह जिनिलीया देशमुखने ठेवलं गोड पत्र; म्हणाली, “कामानिमित्त बाहेर…”

कृतिकाने ‘रात्रीस खेळ चाले’ च्या तिसऱ्या पर्वात ‘शेवंता’ ही भूमिका साकारली होती. नुकतीच सोशल मीडिया पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कृतिका तुळसकरने मुंबईमध्ये बोरिवलीत नवं घर घेतलं आहे. घरात सुरु असलेल्या वास्तुपूजेचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने नवीन घरं घेतल्याचं सांगितलं.

हेही वाचा : Video : प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर हास्यजत्रेच्या कलाकारांची धमाल! व्हिडीओ शेअर करत वनिता खरात म्हणाली, “पार्टी करायला…”

“मुंबईत आल्यानंतर पेइंग गेस्ट, भाड्याचं घर ते स्वतःचं घर यात खूप मोठा काळ होता. पूजेला बसल्यावर त्या सर्व प्रवासावर एक नजर फिरवली तेव्हा वाटलं, बरंच…. काही शिकवणारा होता हा प्रवास. आता नवीन घर नवीन जबाबदारी आणि खूप आनंद.” असं कॅप्शन अभिनेत्रीने या नव्या घराच्या फोटोंना दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : ‘जवान’चा दिग्दर्शक अ‍ॅटली मंचावर आईला घेऊन आला, अन् शाहरुख खानची ‘ही’ कृती ठरली कौतुकास्पद; व्हिडीओ व्हायरल

नव्या घराबद्दल पोस्ट शेअर केल्यावर अभिनेत्रीवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, कृतिकाने छोट्या पडद्यावरील मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.