झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका आजही लोकप्रिय आहे. या मालिकेत झळकलेले सर्वच कलाकार आज सिनेसृष्टीत सक्रीय आहे. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून कृतिका तुळसकरला ओळखले जाते. कृतिकाने या मालिकेत शेवंता हे पात्र साकारले होते. मात्र अनेकदा तिला नकाराचा सामना करावा लागला आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने एक्झिट घेतल्यानंतर शेवंता हे पात्र कोण साकारणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण या मालिकेच्या तिसऱ्या भागासाठी कृतिका तुळसकरची निवड करण्यात आली. नुकतंच कृतिकाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मला सिनेसृष्टीत लूकमुळे अनेकदा नाकारण्यात आले, असा खुलासा केला.
आणखी वाचा : “तुझा कधीही न पाहिलेला फोटो आहे का?” सोहम बांदेकर म्हणाला “माझ्याकडे माझा…”

“तू जाड आहेस, तू बुटकी आहेस, तू काळी आहेस, असं तुम्हाला कुणी म्हटलंय का? मला म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी मी एकदा एका ऑडिशनसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मला तू सुंदर दिसत नाही, असे कारण देत नकार दिला होता. पण यानंतर मला ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका मिळाली. त्यावेळी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या सेटवर अनेक चाहते यायचे. ते भेटायचे आणि तुम्ही किती सुंदर दिसता, असं मला सांगायचे. अनेकदा सोशल मीडियावर मी जे फोटो शेअर करते त्यावरही चाहते कमेंट करत तुम्ही सुंदर दिसता असे सांगतात.” असा किस्सा कृतिकाने सांगितला.

“त्यामुळे मला इतकंच वाटतं की तुम्ही कसेही दिसत असलात, तुमची शारीरिक ठेवण कशीही असली तरी आपण प्रत्येकजण सुंदरच दिसत असतो. त्यामुळे कोण काय म्हणत, याकडे आपण किती लक्ष द्यायचं हे आपलं आपण ठरवायला हवं. कोणी काहीही म्हटलं तरी निराश होऊन रडत बसण्यापेक्षा आपण आपलं काम कसं करतो, किती मन लावून करतो हे जास्त महत्वाचं असते”, असे कृतिकाने म्हटले.

आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कृतिका ही सिनेसृष्टीत १८ वर्षांपासून काम करत आहे. आतापर्यंत तिने अनेक नाटक आणि चित्रपट काम केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.