‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सोहम बांदेकर. या चित्रपटानंतर तो सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुकही झाले. नुकतंच सोहमने त्याच्या एका फोटोबद्दल भाष्य केले आहे.

अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर आस्क मी समथिंग सेशन घेतले. यावेळी त्याला एका चाहत्याने कधीही न पाहिलेला फोटो आहे का? याबद्दल विचारले. त्यावर त्याने मजेशीर उत्तर दिले.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

“माझ्याकडे माझा कधीही न पाहिलेला फोटो आहे. पण तो इतका न पाहिलेला आहे की मी देखील अजून पाहिला नाही”, असे सोहम बांदेकर म्हणाला.

soham bandekar
सोहम बांदेकर

आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सोहम बांदेकरने त्याच्या आई-वडिलांप्रमाणे सिनेसृष्टीत पदार्पण केले. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ ही त्याची पहिली मालिका होती. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. त्यानंतर सध्या सोहम ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहे. ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.