Ravi Dubey and Sargun Mehta New Home : गणेशोत्सव हा सर्वांच्या आवडीचा सण आहे. अनेक कलाकारही आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात. अशातच इंडस्ट्रीतील एका कलाकार जोडप्याने गणेश चतुर्थीनिमित्त नवीन घरात प्रवेश केला आहे, त्यामुळे सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. हे कलाकार जोडपं आहे सरगुन मेहता आणि रवी दुबे. आगामी रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटात रवी दुबे झळकणार आहे.

रवी दुबेने त्याच्या नवीन घरात गणपती बाप्पाचे स्वागत करणारा व्हिडीओ शेअर केला. याबरोबर त्याने लिहिले, “सौभाग्य’ बाप्पा…. आमच्या नवीन घरात आपले स्वागत आहे. सरगुन आणि मी धन्य आहोत.”

या आनंदात अनेक सेलिब्रिटी त्यांच्याबरोबर सामील झाले. अभिनेत्री निया शर्मा देखील यावेळी पोहोचली आणि तिने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओदेखील पोस्ट केले. ज्यामध्ये रवी-सरगुनसह इंडस्ट्रीतील अनेक मित्र तिच्याबरोबर दिसत आहेत.

नियाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, रवी आणि सरगुनच्या नव्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झाल्यामुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. हे घर खूप मस्त आहे. मी आता इथेच राहणार आहे. घरासमोर किती चांगलं दृश्य आहे. घर असावं तर असं, नाहीतर नसावं.

‘१२/२४ करोल बाग’ या टीव्ही शोच्या सेटवर सरगुन मेहता आणि रवी दुबे प्रेमात पडले. दोघांनीही पहिल्यांदा एकाच शोमध्ये एकत्र काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये रवी आणि सरगुनचे लग्न झाले. सरगुन पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत असताना रवी दुबे टीव्हीशिवाय चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही नाव कमवत आहे. आता तो नितेश तिवारीच्या ‘रामायण’ चित्रपटात लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही महिन्यांपूर्वी, सरगुन आणि रवी यांनी त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस ‘ड्रीमयाता ड्रामा’ सुरू केले. या बॅनरखाली, या जोडप्याचे अनेक शो यूट्यूबवर चालू आहेत, जे हिट झाले आहेत. यामध्ये ‘दिल को रफू कर ले’, ‘हाल-ए-दिल’ आणि ‘तू आशिकी है’सारखी नावे समाविष्ट आहेत.