‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमधली राणादा आणि पाठक बाई ही जोडी प्रेक्षकांना खूप भावली. ही जोडी आता प्रत्यक्षात विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत. सध्या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मे २०२२ मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. त्यांच्या लग्नाच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. मागच्या महिन्यामध्ये हार्दिकचा ‘हर हर महादेव’ हा पहिला ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधल्या त्याच्या कामाचे कौतुक होत असतानाच त्याच्या दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा झाली.

महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात तो ‘मल्हारी लोखंडे’ यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या पोस्टखाली अक्षयाने कमेंट देखील केली आहे. हार्दिकने काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. तेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला होता. गप्पा मारताना त्याने “आम्ही पुण्यामध्ये लग्न करणार आहोत”, असे सांगितले होते. पण त्यावेळी त्याने लग्नाच्या तारखेसंबंधित बोलणे टाळले होते. मराठी सिनेसृष्टीमधील या लोकप्रिय जोडीच्या लग्नाबद्दलची नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – कुंकू टिकली वादावर शरद पोंक्षे यांचा अप्रत्यक्षरित्या टोला! चर्चचा फोटो शेअर करत म्हणाले, “पाद्रींचे आडनाव भिडे…”

अभिनेत्री ऋचा आपटेने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमध्ये हार्दिकच्या ट्रेनर-मॅनेजरचे पात्र साकारले होते. तेव्हापासून हार्दिक, अक्षया आणि ऋचा यांची चांगली मैत्री आहे. त्यांचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. नुकताच ऋचाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये हार्दिक आणि अक्षय्या यांची लग्नाची पत्रिका स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने ‘रांझना’ या चित्रपटातील गाणं जोडलं आहे. ऋचाने शेअर केलेल्या या पोस्टवरुन त्यांचा विवाहसोहळा लवकरच संपन्न होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा – ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकांनी एकत्र येत प्रेक्षकांना दिली खास भेट, ट्वीट करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१ मध्ये ऋचा आपटेने क्षितिज दाते याच्याशी लग्न केले. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ अशा चित्रपटांमध्ये क्षितिजने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘धर्मवीर’ या चित्रपटामध्ये त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पात्र साकारले होते. या भूमिकेमुळे त्याच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती.