Rupali Bhosale and Dnyanada Ramtirthkar on Skin Care Tips: कलाकार जितके त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. तितकीच त्यांच्या राहणीमानाची, ते ज्या पद्धतीने त्यांच्या आरोग्याची, त्वचेची काळजी घेतात, याचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. आपल्या आवडत्या कलाकारांबाबत काही खास गोष्टी जाणून घेण्यास चाहते कायम उत्सुक असतात. अनेकदा त्यांच्याप्रमाणेच स्वत:च्याही आयुष्यातही चाहते बदल करत असतात.

रुपाली भोसले व अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर काय म्हणाल्या?

आता अभिनेत्री रुपाली भोसले व अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांनी त्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करतात, यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी ‘पिंक मज्जा’शी संवाद साधला. रुपाली भोसले स्कीन केअर टीप्स देताना म्हणाली, “स्कीन केअरसाठी मी एवढंच म्हणेन की छान राहा, आनंदी राहा. तणावात राहू नका. तणावमुक्त राहा.”

पुढे ती म्हणाली, “रात्री झोपताना विचारांचा जो कल्लोळ माजलेला असतो, तो बंद करा आणि छान ८ तासांची झोप घ्या. आतून छान राहिलात तर मला वाटतं तुमची त्वचा खूप छान राहते.”

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर म्हणाली, “स्कीन केअर टीप ही आहे की पुरेशी झोप घ्या, खूप पाणी प्या. एवढं केलं तरी खूप आहे. हे माझ्यासाठीही महत्वाची आहे.”

ज्ञानदा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती काव्या ही भूमिका साकारताना दिसत आहे. चिडकी, आरडाओरडा करणारी, अन्याय सहन न करणारी, सडेतोड उत्तर देणारी, कट रचणाऱ्या आत्याला धडा शिकवणारी, आई-वडिलांसाठी स्वत:च्या प्रेमाचा त्याग करून दुसऱ्या मुलाशी लग्न करणारी, प्रेमळ अशी ही काव्या सध्या प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे.

काव्याचा तिच्या नंदिनी ताईवर खूप जीव असल्याचे पाहायला मिळते. तसेच, सध्या पार्थ देशमुखबरोबरची तिची भांडणेदेखील लक्ष वेधून घेतात. पार्थ काव्यामधील ही केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतील पडते. मालिकेबरोबरच अभिनेत्री सोशल मिडिया, तसेच युट्यूब व्हिडीओमधूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येते. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

रुपाली भोसलेच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेत्रीने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली असली तरी तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले. या मालिकेनंतर ती शिट्टी वाजली रे या शोमध्येदेखील सहभागी झाली होती.

अभिनेत्री लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तिने सरकार ही भूमिका साकारली आहे. मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. रुपालीबरोबरच मालिकेत अभिनेत्री कृतिका देव व अभिनेता चेतन वडनेरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यास यशस्वी ठऱणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.