गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांनी साखरपुडा केला. तसेच काहींनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कलाकारांच्या साखरपुड्याचे व लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकरचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. काही दिवसांपूर्वीच तो होणारी बायको, प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार सोनाली गुरवसह गणपती पुळेच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. अभिषेक व सोनालीचा गणपती पुळेचा फोटो खूप व्हायरल झाला होता.

गेल्या काही वर्षांपासून अभिषेक गावकर व सोनाली गुरव एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर नेहमी दोघं रोमँटिक फोटो शेअर करत असतात. काल, ९ एप्रिलला दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने शिवानी सोनारसह गुपचूप उरकला साखरपुडा, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

साखरपुड्यातील अभिषेक व सोनालीच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साखरपुड्यात एकमेकांना अंगठी घालताना अभिषेक व सोनाली एकमेकांच्या पाय पडले. त्यांची ही कृती पाहून उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्री ‘मेड इन इंडिया’ फेम मिलिंद सोमणबरोबर झळकणार, फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिषेकच्या कामाबद्दल बदल बोलायचं झालं तर, तो ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये विविध भूमिकेत पाहायला मिळाला होता. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. तसेच ‘सन मराठी’वर ‘माझी माणसं’ या मालिकेतही तो पाहायला मिळाला. अभिषेकची ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील भूमिका गाजली होती. अभिषेक प्रमाणे त्याची होणारी बायको सोनालीचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे सोशल मीडियावर ३ लाख १२ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.