छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ अल्पावधीतच या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामुळे भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे यांसारखे विनोदवीर घराघरांत पोहचले. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात चाहते आहेत.

आता नुकतेच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘चला हवा येऊ द्या’च्या दशकपूर्तीनिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. झी मराठीने आपल्या इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सागर कारंडे भावनिक पत्र वाचताना दिसत आहे.

सागर पत्र वाचताना असं म्हणतो की, “यशाचे हजारो बाप असतात, पण अपयश नेहमी अनाथ असतं. पण, झी मराठीच्या कुटुंबामुळे आम्ही यश पचवू शकलो आणि सगळ्यात मोठा आधार होता तो म्हणजे मराठी माणसाचा. मराठी माणूस कुणाला हवेत जाऊ देत नाही, ताबडतोब जमिनीवर आणतो. मराठी प्रेक्षक फक्त कौतुक करतात असं नाही हा; वेळ आली की कानउघाडणीही करतात. त्यामुळे आमचे पाय कायम जमिनीवर राहिले.” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

निलेश साबळेने ‘चला हवा येऊ द्या’मधून पडला बाहेर

काही दिवसांपूर्वीच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून नीलेश साबळेने निरोप घेतला. एका मुलाखतीत नीलेशने याबाबतचा खुलासा केला होता. तब्येतीच्या कारणाने मी या कार्यक्रमातून बाहेर पडत असल्याचे नीलेशने सांगितले होते. आता चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर नीलेश मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- मालिकेनंतर आता हेमांगी कवीची हिंदी शोमध्ये लागली वर्णी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चला हवा येऊ द्या’चा पहिला भाग २०१४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुरुवातीला या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. पण, नंतर नंतर या कार्यक्रमाचा टीआरपी घसरतच गेल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे सध्या हा कार्यक्रम चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. आता चला हवा येऊ द्या पुन्हा कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.