‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडे २६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नगाठ बांधून तितीक्षाने आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं. मोठ्या थाटामाटात, पारंपरिक पद्धतीत तितीक्षा व सिद्धार्थचा लग्नसोहळा झाला. काल, २६ मार्चला तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला. यानिमित्ताने तितीक्षाने तिच्या युट्यूब चॅनलवर सासरच्या गृहप्रवेशचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत, वाजतगाजत तितीक्षा व सिद्धार्थची वरात पाहायला मिळत आहे. फुलांचा वर्षाव करत सर्वजण दोघांचं स्वागत करत आहेत. यावेळी सिद्धार्थची आई सून घरी येते असल्यामुळे खूप आनंदी झाल्याचं पाहायला मिळत आहेत. त्या म्हणतात, “खूप छान वाटतंय. माझी सून आज माझ्या घरी आली आहे. माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीला आशुतोषची येतेय आठवण, मधुराणी प्रभुलकर पोस्ट करत म्हणाली…

वाजगाजत, फुलांचा वर्षावाने दोघांचं स्वागत झाल्यानंतर तितीक्षा धनधान्याने गच्च भरलेलं माप ओलांडते. सासरी गृहप्रवेश होण्याआधी अभिनेत्री एक भन्नाट उखाणा घेते. तितीक्षा म्हणते, “हळद लागली, लग्न झालं, आता झाली वरात, सिद्धार्थचं म्हणालाय तू अशी जवळी राहा, आता येऊ देना घरात.”

हेही वाचा – “तुला कधीच…”, ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची आईसाठी खास पोस्ट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तितीक्षा तावडेचा हा गृहप्रवेशाचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “नांदा सौख्यभरे”, “माझी आवडती जोडी”, “तुम्ही दोघं खूप छान दिसता”, “खूप गोड”, अशा प्रतिक्रिया तितीक्षाच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओ चाहत्यांनी दिल्या आहेत.