‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकार जितके त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात तितकेच ते त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत असतात. विशेष म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रीनेची डान्स व्हिडीओ, मजेशीर व्हिडीओ हे नेहमी व्हायरल होतं असतात. अशातच मालिकेतील नेत्रा आणि रुपाली म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे व ऐश्वर्या नारकर यांच्यामध्ये अभिनयाचं चॅलेंज पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ ऐश्वर्या नारकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – “तिच्यासाठी प्रार्थना करा”, राखी सावंतच्या गर्भाशयातील ट्यूमर काढल्यानंतर आणखी एका ट्यूमरचं निदान, भावाने दिली माहिती

“अभिनय टेलिपॅथी चॅलेंज…तुमच्या मित्रांबरोबरही करा…”, असं कॅप्शन देत ऐश्वर्या नारकरांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एकाबाजूला ऐश्वर्या नारकर आहेत, तर दुसऱ्या बाजूला तितीक्षा तावडे आहे. या अभिनयाच्या चॅलेंजमध्ये सुरुवातीला दोघांनी माकडाचा अभिनय करायला सांगितला. त्यानंतर चक्कर येण्याचा अभिनय, मग अनोळख्या व्यक्तीसमोर बोलतानाचा अभिनय, हॉरर चित्रपट बघतानाचा अभिनय करताना ऐश्वर्या नारकर व तितीक्षा तावडे दिसत आहेत. दोघींचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या लग्नाआधी RSS प्रमुख मोहन भागवतांनी अँटिलियामध्ये घेतली अंबानी कुटुंबाची भेट, व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या नारकर व तितीक्षा तावडे यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तितीक्षा अभिनयाच्या या चॅलेंजमध्ये विजेती असल्याचं सांगितलं आहे. तर काहींनी ऐश्वर्या नारकर जिंकल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा – Video: ‘मुरांबा’ मालिकेत झळकलेल्या ‘या’ अभिनेत्याची स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’मध्ये जबरदस्त एन्ट्री! पाहा प्रोमो

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत सध्या काय सुरू आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा ही गरोदर आहे. अशा परिस्थितीत विरोचकाने नेत्रा व अद्वैतला आव्हान दिलं आहे. विरोचक नेत्रा व अद्वैतच्या बाळाला या जगात न येण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता विरोचकाच्या या आव्हानाला नेत्रा व अद्वैत कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.