Savalyachi Janu Savali Twist: सारंग व सावली ही दोन पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. आता ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसत आहेत.

सावळ्याची जणू सावली‘ मालिकेत सतत नवनवीन गोष्टी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच पैशांसाठी सारंगशी लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या अस्मीचे सत्य सर्वांसमोर आले. सावलीने अस्मी मेहेंदळे कुटुंबाला फसवत असल्याचे सर्वांसमोर आणले होते. त्यानंतर सारंगने सावलीवर त्याचे प्रेम आहे, असे सर्वांसमोर मान्य केले. तसेच सावलीला लग्न करशील का, असे म्हणत लग्नाची मागणी घातली. अशा प्रकारे सावली व सारंग यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.

आता सावली व सारंग यांच्यातील काही प्रेमाचे क्षण अनेकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतात. सारंगचे सावलीवर मनापासून प्रेम असल्याचे त्याच्या कृतीतून दिसते. तो वेळोवेळी तिला मदत करतो, तिला सावरून घेतो. सावलीदेखील सारंगवर प्रेम करते, मात्र तिने तिचे सर्वात मोठे सत्य सारंगला सांगितलेले नाही.

सारंगला आवडत असलेला ताराचा आवाज हा खरेतर सावलीचा आहे. पण, जगासमोर तारा लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. सारंगला ताराच्या आवाजातील गाणी खूप आवडतात. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये ती तिच्या आवाजाचे सत्य सारंगला सांगणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘सावळ्याची जणू सावली’मध्ये पुढे काय घडणार?

झी मराठी वाहिनीने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते, सारंग रेडिओवर ताराने गायलेले गाणे ऐकत आहे. तिथे सावलीदेखील आहे. सावली मनात म्हणते, “सारंग सर, तुम्ही किती प्रेम करता, पण मी तुमच्या प्रेमासाठी पात्र आहे की नाही माहीत नाही.” तितक्यात गाण्यात हरवलेला सारंग अचानक सावलीला विचारतो, “सावली, तू माझ्यापासून काही लपवतेस का?”

सावली म्हणते, हे गाणं…”, तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सारंग म्हणतो, हे गाणं मला तितकंच आवडतं जितकं माझं तुझ्यावर प्रेम आहे.” सारंग व सावली यांच्यामध्ये हा संवाद सुरू असताना तारा त्यांच्या खोलीबाहेर असल्याचे दिसते. तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव दिसत आहेत.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सावली सारंगला सांगणार का तिच्या आवाजामागील सत्य”, अशी कॅप्शन दिली आहे.

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी फक्त सारंगला तरी हे सत्य सांग अशा कमेंट्स केल्या आहेत. भैरवी वझे म्हणजेच ताराच्या आईने सावलीचा आवाज तिच्याकडे गहाण ठेवला. सावली तारासाठी गाणार, म्हणजेच जगासमोर तारा गाणे गात असणार, पण तो आवाज सावलीचा असेल. त्या बदल्यात भैरवी सावलीच्या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करणार असे ठरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता सावली खरंच तिचे सत्य सारंगला सांगणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.