Savlyachi Janu Savali Serial Promo : ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सध्या सावली राजकुमारच्या अफेअरचं सत्य सर्वांसमोर उघड करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सावलीसमोर काही दिवसांपूर्वीच राजकुमार दुसऱ्या मुलीच्या प्रेमात असल्याचा खुलासा झाला. राजकुमार अमृता वहिनींची फसवणूक करतोय, त्यामुळे काहीही झालं तरी हे सत्य मेहेंदळे कुटुंबासमोर आणायचं असा निश्चय सावली करते.

सुरुवातीला सावलीच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. ऐश्वर्या तर संपूर्ण कुटुंबासमोर सावलीलाच खोट्यात पाडते. यामुळे सावली राजकुमारचं अफेअर उघड करण्यासाठी देवाची मदत घेते. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे देवा आणि सावली दोघंही राजकुमारवर नजर ठेवून असतात. राजकुमार जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडला नेकलेस देऊन मिठी मारतो…तेव्हा सावली गुपचूप व्हिडीओ काढते. यानंतर देवा राजकुमारच्या घरी घेऊन जाण्याचा प्लॅन बनवतो.

सावलीला फोन करून तो आधीच सगळी कल्पना देतो आणि मी कुठल्याही क्षणी घरी पोहोचेन असंही सांगतो. सावली देवाची वाट बघत असते… इतक्यात देवासह राजकुमार आणि त्याची गर्लफ्रेंड मेहेंदळेंच्या घरी हजर होतात. यावेळी राजकुमारला मोठा धक्का बसतो.

यानंतर देवा तिलोत्तमासमोर राजकुमार आणि त्या मुलीचा एकमेकांना मिठी मारत असतानाचा व्हिडीओ दाखवतो. याशिवाय या व्हिडीओमध्ये राजकुमार त्याच्या गर्लफ्रेंडला महागडा नेकलेस गिफ्ट देत असल्याचं देखील स्पष्टपणे दिसत असतं.

राजकुमारचा व्हिडीओ पाहून मेहेंदळे कुटुंबातील प्रत्येकाला धक्का बसतो. यानंतर राजकुमार, “हे सगळं खोटंय” हे सांगण्यासाठी त्याच्या आईसमोर येतो. पण, त्याच्या या नाटकी स्वभावाचा तिलोत्तमाला काहीच फरक पडत नाही. मुलाचे कारनामे पाहून ती भयंकर संतापते आणि सर्वांसमोर राजकुमारच्या कानाखाली लगावते. नवऱ्याचा दुसऱ्या मुलीबरोबरचा व्हिडीओ पाहून अमृता देखील प्रचंड दुखावते.

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा हा विशेष भाग ३१ जुलै आणि १ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केला जाणार आहे. प्रेक्षक सुद्धा या नव्या ट्विस्टमुळे खूश झाले आहेत. अनेकांनी मालिका इतक्या रंजक वळणावर असताना प्लीज याची वेळ बदलू नका असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका ११ ऑगस्टपासून सांयकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेमुळे हा बदल करण्यात आला आहे.